voting in summer file photo esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : सूर्य आग ओकत असतानाच सर्वाधिक मतदान! सकाळी नऊ ते दुपारी तीनदरम्यान मतदान केंद्रांवर रांगा

Dhule News : सकाळी सात ते सायंकाळी पाचदरम्यान झालेल्या मतदानाची स्थिती पाहिली तर धुळे ग्रामीण मतदारसंघात सकाळी नऊ ते अकरादरम्यान सर्वाधिक मतदान झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) शांततेत मतदान झाले. धुळे शहरात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेल्या तापमानात किती मतदार बाहेर पडतील याची चिंता राजकीय पक्षांसह प्रशासकीय यंत्रणेला होती.

अंतिम आकडेवारी समोर आल्यानंतर नेमकी याबाबत नेमकी स्थिती कळू शकेल. मात्र, सकाळी सात ते सायंकाळी पाचदरम्यान झालेल्या मतदानाची स्थिती पाहिली तर धुळे ग्रामीण मतदारसंघात सकाळी नऊ ते अकरादरम्यान सर्वाधिक मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. (Dhule Lok Sabha Election 2024 Maximum voting while sun burning)

दुसरीकडे धुळे शहर मतदारसंघात भरदुपारी अर्थात दुपारी एक ते तीनच्या दरम्यान सर्वाधिक मतदान झाले. एकूण स्थिती पाहिली तर सकाळी नऊ ते दुपारी तीन या सहा तासांतच या दोन्ही मतदारसंघांत सर्वाधिक मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसते.

मतदानाचा हक्क

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी सातपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक रिंगणातील उमेदवार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळीच मतदानासाठी घराबाहेर पडले. त्या-त्या भागातील मतदान केंद्रांत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सर्वसामान्य मतदारांकडे सर्वांचे लक्ष होते. अगदी सकाळी सर्वसामान्य मतदार पाहिजे तसा घराबाहेर पडला नाही. त्यामुळे सकाळी सात ते नऊदरम्यान मतदानाची टक्केवारी जास्त नव्हती. या वेळात धुळे ग्रामीण मतदारसंघात ७.८६, तर धुळे शहर मतदारसंघात ५.८४ टक्के मतदान झाले. (latest marathi news)

सकाळी नऊनंतर रांगा

सर्वसामान्य मतदारांची मतदान केंद्रांवर सकाळी नऊनंतर गर्दी पाहायला मिळाली. धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदार रांगा लावून आपल्या मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळाले. साक्री रोड परिसरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयातील मतदान केंद्रांवरही सकाळी नऊनंतर मोठ्या प्रमाणावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली.

मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवरही मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या. अँग्लो ऊर्दू हायस्कूल, नॅशनल हायस्कूल, स्वेस हायस्कूल, मनपा शाळा-४, ५ तसेच ४४, ४५, अलहेरा हायस्कूल, शारदा हायस्कूल, गरुड प्रायमरी स्कूल, कनोसा कॉन्व्हेंट आदी विविध ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या.

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी

वेळ.........धुळे शहर...धुळे ग्रामीण

७ ते ९......५.८४.......७.८६

७ ते ११....१६.२१.....२०.१२

७ ते १......२७.१२.....३१.३९

७ ते ३......३८.४१.....४२.३४

७ ते ५......४६.१६.....५०.३१

दर दोन तासांत मतदानाची टक्केवारी

वेळ............धुळे शहर......धुळे ग्रामीण

७ ते ९.........५.८४..........७.८६

९ ते ११.......१०.३७........१२.२६

११ ते १.......१०.९१........११.२७

१ ते ३.........११.२९........१०.९५

३ ते ५..........७.७५.........७.९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT