Election  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election 2024: भरपगारी सुटी वा 2 तासांची सवलत द्यावी; मतदानासाठी आस्थापनांना सरकारी कामगार अधिकाऱ्यांची सूचना

Dhule News : गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की संस्था, आस्थापना आदी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीसाठी ०१- नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) मतदान होणार आहे. या मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या दिवशी सर्व उद्योजक, आस्थापना मालकांनी त्यांच्या उद्योग, आस्थापनेत कार्यरत मतदार कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुटी द्यावी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हा सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी दिले. (Dhule Lok Sabha Election 2024 Provide ample leave or 2 hours relaxation )

श्रीमती सूर्यवंशी यांनी सांगितले, की लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या परिच्छेद १३५ ब नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की संस्था, आस्थापना आदी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत.

त्यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते. ते लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी द्यावी.

सुटी ही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील. त्यात खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने, इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींचा समावेश आहे. (Latest marathi news)

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. याबाबत संबंधित महापालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही स्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

निर्णयाचे काटेकोर पालन करावे

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालकांनी, व्यवस्थापकांनी या निर्णयाचे अनुपालन काटेकोरपणे होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा सरकारी कामगार अधिकारी सूर्यवंशी यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT