Dhule Lok Sabha Election 2024 Result : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे निष्णात सर्जन डॉ. सुभाष भामरे यांची हॅट्रीक चुकवतांनाच फेरमतमोजणीत सर्जरी करून विजयी झालेल्या काॅंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव या जायंट किलर ठरल्या आहेत. त्यांनी न भूतो न भविष्यती असा तब्बल ५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवताना भाजपचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. (Dhule Lok Sabha Election 2024 Result Congress Dr Shobha Bachhav win)
देशभरातील हिंदू - मुस्लिम ध्रृवीकरणाचा मुद्दा या मतदारसंघात काँग्रेसला फायदेशीर ठरला. हा मतदारसंघ काॅंग्रेसचा ऐकेकाळचा बालेकिल्ला होता. भाजपने गेल्या तीन निवडणुकीपासून त्यावर कब्जा केला होता. या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार निश्चितीसाठी मोठा कालावधी लागला.
अंतिम टप्प्यात दहा दिवस अगोदर डॉ. बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाली. प्रचारासाठी त्यांना कमी अवधी मिळाला. त्यातही नाराजांची मनधरणी करावी लागल्याने त्यात वेळ वाया गेला. तथापी मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ व अन्य पाच मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी ही निवडणूक हातात घेऊन जोमाने प्रचार केला. कुठलीही अपेक्षा बाळगली नाही.
त्याची फलश्रृती मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात ६८ टक्केहून अधिक २ लाख ५ हजार ७५९ मतदान झाले. त्याचवेळी मध्यची आघाडी महायुतीचे गणीत चुकवणार यंदा एमआयएम व वंचित आघाडीच उमेदवार नसल्याने काॅंग्रेसच्या पथ्यावर पडणार हा सकाळ चा अंदाज खरा ठरला.
मालेगाव मध्यची आघाडी मोडून काढणे भाजपला शक्य झाले नाही. त्यात भरीस भर ॲण्टी इन्कमबंसी, कांदा, महागाई, भाजपच्या पक्षांतर्गत लाथाळ्या, फाजील आत्मविश्वास, मित्रपक्षांना विश्वासात न घेणे, भाजप उमेदवारी साठी इच्छुक असलेल्या अर्धा डझन इच्छूकांची नाराजीचा फटका भाजपला बसला. यामुळे मध्य मधील मुस्लिम बांधवांनी केलेले भरभरून मतदान व अन्य मतदारसंघातून लागलेला हातभार यामुळे डॉ. बच्छाव यांचा विजय सुकर झाला. (latest marathi news)
या मतदार संघात विद्यमान खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ . सुभाष भामरे हे सलग तिसऱ्यांदा नशिब अजमावत आहे. प्रारंभी एकतर्फी वाटणारी लढत महाविकास आघाडीच्या काॅंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या एकतर्फी मतदानामुळे चुरशीची झाली होती.
तरीदेखील डॉ. बच्छाव यांचा प्रचार करणाऱ्यांना विजयाबद्दल आत्मविश्वास नव्हता. दुसरीकडे त्यांना राजयोग आहे. त्यांचे नशिब बलवत्तर आहे. धुळे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान त्या मिळवतील असे निवडक समर्थक खात्रीने सांगत होते. आगळ्यावेगळ्या व क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक ठरलेल्या मतमोजणी नंतर हा राजयोग जुळून आला.
डॉ. बच्छाव यांच्या विजयासाठी काॅंग्रेससह त्यांच्या मित्रपक्षांनी प्रामाणिकपणे काम केले. आमदार कुणाल पाटील, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार फारूख शाह, माजी आमदार आसीफ शेख, संजय चव्हाण, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, श्याम सनेर यांचे परिश्रम कामी आले.
ऐनवेळी शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी डॉ. बच्छाव यांना पाठींबा जाहीर करून कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर केला. त्याचाही मोठा हातभार लागला. मालेगाव बाह्य व बागलाण विधानसभा मतदारसंघात या कार्यकर्त्यांसह डॉ. बच्छाव यांच्या नातेवाईकांच्या गोतावळ्यानेही मोलाची मदत केली. या सर्वांची परिणीती विजयात झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.