Dhule Lok Sabha Constituency : आयुष्यभर अडाणी म्हणून संबोधले गलेले धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे २६ हजार ४५४ प्रौढांनी यंदा प्रथमच साक्षरतेचे धडे गिरविले. त्यात मतदान प्रक्रियेची माहितीही मिळविली. मतदान यंत्र, मतदार कार्ड, उमेदवार, मतमोजणी प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व अशी संपूर्ण माहिती त्यांना शिकविण्यात आली. त्यातून जागृत झालेल्या या प्रौढ निरक्षरांचे लोकसभेच्या निवडणुकीतील मत कुणाच्या पारड्यात असेल, हा उत्सुकतेचा विषय ठरत आहे. (26 thousand old age people voters in Dhule and Nandurbar district )
उत्तर महाराष्ट्रात सुमारे ९३ हजार २६० प्रौढ निरक्षर मतदारांची संख्या आहे. त्यात धुळे जिल्ह्यात १० हजार २७१, नंदुरबार १६ हजार १८३, जळगाव ४१ हजार ९७१ आणि नाशिक जिल्ह्यातील २४ हजार ८३१ मतदारांचा समावेश आहे. लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात २० मेस मतदान आहे, तर नंदुरबारसाठी चौथ्या टप्प्यात १३ मेस मतदान झाले आहे.(latest marathi news)
येथे निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज आहे. मतदार पुनरीक्षण कार्यक्रम पार पडून २३ जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली. त्यानुसार लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील २० लाख ७५२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात महिला मतदारांची संख्या नऊ लाख ५९ हजार ४१६ एवढी आहे. धुळे जिल्ह्यातील १८ ते २३ वयोगटातील १७ हजार ३२१ नवीन मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तसेच ८५ वर्षांवरील वयोगटातील मतदारांची संख्या २३ हजार इतकी आहे. जिल्ह्यात दहा हजार ९०० इतके मतदार हे दिव्यांग आहेत. लोकसभेच्या धुळे मतदारसंघात धुळे ग्रामीण तीन लाख ९० हजार ६२२, धुळे शहर तीन लाख ३८ हजार ८३०, शिंदखेडा तीन लाख २९ हजार ९१०, मालेगाव मध्य दोन लाख ९९ हजार ७४८, मालेगाव बाह्य तीन लाख ५७ हजार ३११ तसेच बागलाण दोन लाख ८४ हजार ३३१ असे एकूण २० लाख ७५२ मतदार मतदान करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.