Essential service personnel queuing up to vote. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : मतदानाचा हक्क 407 मतदारांनी बजावला; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुविधा

Lok Sabha Election : मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष सुविधा दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी २० मेस मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष सुविधा दिली आहे. त्यानुसार बुधवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील केंद्रात ४०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ( 407 voters exercised their right to vote )

मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील तळमजल्यालगतची उजवीकडील खोली क्रमांक एक (माध्यम कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे टपाली मतदान कक्ष (पोस्टल वोटिंग सेंटर) स्थापन करण्यात आला आहे.

या ठिकाणी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिवसभरात ४०७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा नोडल अधिकारी संदीप पाटील यांनी दिली.(latest marathi news)

मतदानाचे आवाहन

धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकेद्वारे बजावता यावा यासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, माहिती व जनसंपर्क भवन, तळमजल्यालगतची उजवीकडील खोली क्रमांक एक (माध्यम कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे १४ ते १६ मे या कालावधीत सकाळी नऊ ते सांयकाळी पाचपर्यंत टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील १०९१, तर आठ इतर जिल्ह्यातील, असे एकूण एक हजार ९९ अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. पैकी मंगळवारी २०९, तर बुधवारी ४०७ अशा एकूण ६१६ अत्यावश्यक सेवेतील उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित मतदारांनी गुरुवारी (ता. १६) आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT