devendra fadnavis esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : मोठ्या उद्योगांचे लवकरच धुळे केंद्र : देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election : डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. १३) येथे उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. १३) येथे उपस्थित होते. त्यांनी या मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात निरनिराळ्या विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांची प्रशंसा केली. ( Devendra Fadnavis statement Dhule Center of Big Industries Soon )

तसेच पायाभूत सुविधांच्या विकासामुळे मोठ्या उद्योगांचे लवकरच धुळे केंद्र होणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. श्री. शहा, श्री. फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात जिल्हा विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. श्री. फडणवीस म्हणाले, की या जिल्ह्यात ४० वर्षे अक्कलपाडा सिंचन प्रकल्पाला विलंब लावण्यात आला. मात्र, डॉ. भामरे यांच्या पाठपुराव्यामुळे १७० कोटींचा निधी या प्रकल्पाला मिळाल्याने तो पूर्ण होऊ शकला.

तसेच डॉ. भामरे, श्री. रावल यांच्या पाठपुराव्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील दोनशे गावांत सुखसंपन्नता आणणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी अडीच हजार कोटींचा निधी मिळाला. तापी-बुराई योजनेसाठी श्री. रावल यांच्या पाठपुराव्यामुळे आठशे कोटींचा निधी मिळाला असून, हे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

नार-पार योजना

खानदेश, मराठवाडा सुजलाम-सुफलाम होण्यासाठी पश्‍चिमी वाहिन्या पूर्वेला आणून नार-पार प्रकल्प अमलात आणणार आहोत. डॉ. भामरे यांच्यामुळे मनमाड- इंदूर रेल्वे मार्गांतर्गत बोरविहीर-नरडाणा रेल्वेमार्गाचे काम होत आहे. सहा राष्ट्रीय महामार्गांचे काम झाले आहे. (latest marathi news)

चौपदरीकरण, मुबलक पाणी, रोजगारक्षम मुंबई- दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पात धुळ्याचा समावेश या सर्वांमुळे कनेक्टिव्हिटीचा लाभ पाहाता धुळे मोठ्या उद्योगांचे लवकरच केंद्र होणार आहे. डॉ. भामरे यांनीही काँग्रेसमधील राजवटीत प्रलंबित, न झालेले प्रकल्प मोदींच्या नेतृत्वात दहा वर्षांत मार्गी लावल्याचे सांगत विकासकामांचा लेखाजोखा मांडला.

शहा यांची भूमिका

केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी येथील खानदेशची कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी, गुरुद्वारा, कालिकामाता, सिद्धेश्‍वर गणपती मंदिर, रोकडोबा हनुमान मंदिर आदी शहर व जिल्ह्यातील सर्व देवस्थानांना प्रणाम करीत भूमिका मांडली. मोदी सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत धुळे जिल्ह्यात साडेतीन लाख घरांपर्यंत ‘नल जे जल’ पोचल्याचे ते म्हणाले.

प्रलंबित विकास प्रकल्प, सिंचनाचे प्रकल्प, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाड्यापेक्षा साडेतीन टीएमसीने अधिक क्षमता असलेल्या जामफळ धरणाचे काम डॉ. भामरे यांनी पाठपुराव्यातून मार्गी लावले. सहा राष्ट्रीय महामार्ग जिवंत केले. रेल्वेमार्गाचे काम आणि २५ हजार घरकुलांचे काम मार्गी लागल्याचे श्री. शहा यांनी नमूद केले. श्री. रावल, श्री. भुसे, अनुप अग्रवाल, संजय शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT