Dhule Lok Sabha Constituency  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात विशेष निर्बंध लागू : जिल्हादंडाधिकारी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राचे शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये विशेष निर्बंधाचे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी लागू केले आहेत. जिल्ह्यात १८ मे सायंकाळी सहापासून ते २० मे २०२४ ला मतदानाच्या दिवशी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुढील बाबींवर निर्बंध लागू राहील. (Special restrictions in 100 meters area of ​​polling station )

यात बेकायदेशीर जमाव जमविण्यास व सार्वजनिक प्रचारसभा आयोजनास बंदी असेल. मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रित करण्यावर बंदी राहील. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहील. याव्यतिरिक्त इतर व्यक्तींस मतदान केंद्रात प्रवेशावर बंदी असेल.

विविध निर्देश

मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी करणे तसेच मतदान केंद्राचे १०० मीटर परिसरात प्रचार करण्यास बंदी राहील. मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर ने-आण करण्याच्या प्रथेस पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, खासगी कार, ट्रॅक, ऑटोरिक्षा, मिनी बस, स्टेशन व्हॅन, स्कूटर, मोटारसायकल आदी सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी राहील. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठी वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राच्या परिसरात भित्तिपत्रके, ध्वज, चिन्ह आणि इतर प्रचारसाहित्य यांचे प्रदर्शन करण्यास बंदी राहील.

व्यक्तीला सुरक्षितता

ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल अशी कोणतीही व्यक्ती त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रवेश करणार नाही. तसेच अशी व्यक्ती मतदार असली तरी निव्वळ मतदान करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदान केंद्र परिसरात ये-जा करण्यावर निर्बंध राहील.

तथापि, विशेष सुरक्षाव्यवस्था प्रदान केलेल्या व्यक्तीच्या विशेष सुरक्षापथकास शस्त्रांसह मतदान केंद्राच्या केवळ दारापर्यंत संरक्षित व्यक्तीसोबत जाता येईल व एका वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यास शस्त्राचे प्रदर्शन न करता तसेच मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अडथळा न करता संरक्षण व्यक्तीस मतदान केंद्रात सोबत करता येईल.(latest marathi news)

प्रतिबंधाबाबत सूचना

ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आलेली असेल किंवा त्या व्यक्तीकडे खासगी सुरक्षारक्षक आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीस निवडणूक प्रतिनिधी वा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंदी राहील. मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट आदी नेण्यास प्रतिबंध राहील. मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथकप्रमुख, निवडणुकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना वरील प्रतिबंध लागू राहणार नाही. खालील बाबींवर निर्बंध राहणार नाहीत.

वाहनांबाबत सूचना

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १८ मे २०२४ ला सांयकाळी सहापासून ते २० मेस मतदानाच्या दिवशी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील बाबींवर निर्बंध लागू राहणार नाही. यात धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार १८ मे २०२४ ला सायंकाळी सहापासून बंद होत असला तरी डोअर टू डोअर प्रचारावर निर्बंधाचे कालावधीत प्रतिबंध असणार नाही;

परंतु पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. दवाखान्याच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स, दूधगाड्या, पाण्याचे टँकर, विद्युत विभाग, पोलिस, निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहित मार्गाने जाणाऱ्या प्रवासी बसगाड्यावर बंदी राहणार नाही. टॅक्सी आदी वाहने बस स्टेशन, रेल्वे स्टेशन हॉस्पिटलकडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही.

दिव्यांग, आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणे-येण्या वैयक्तिक वाहनास बंदी असणार नाही. आदेश ध्वनिक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करून त्यास प्रसिद्धी द्यावी. हे आदेश मतदानाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरीक्षकांना लागू राहणार नाही, असेही जिल्हा दंडाधिकारी गोयल यांनी नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT