Lok Sabha Election esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : शेतकरी, तरुण, महिलांचे प्रश्‍न केंद्रस्थानी : डॉ. शोभा बच्छाव

Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील शेतकरी, तरुण, महिलांसह विविध समाजघटकांचे प्रश्‍न केंद्रस्थानी ठेवत ते सोडविण्यासाठी तत्पर असेल.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील शेतकरी, तरुण, महिलांसह विविध समाजघटकांचे प्रश्‍न केंद्रस्थानी ठेवत ते सोडविण्यासाठी तत्पर असेल. त्यासाठी अधिकाधिक मतदारांचे पाठबळ मिळावे, असे आवाहन काँग्रेस-महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले. देशहितासाठी महत्त्वाच्या असलेल्या निवडणुकीसाठी २० मेस मतदान होणार आहे. शेतकरी व समाजजीवनाला कलाटणी देऊ शकणारी ही निवडणूक आहे. (Dr Sobha Bachhav statement on Farmers youth and women issues at center stage )

इंडिया आघाडीच्या नेतृत्व करणाऱ्या सोनीया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, सीताराम येचुरी यांनी सत्तापरिवर्तनासाठी कंबर कसत धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची संधी दिली, असे सांगत डॉ. बच्छाव यांनी प्रचारावर भर दिला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

त्यानुसार केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदीमुळे उत्पादकांमध्ये असंतोष आहे. शेतकरीविरोधी तीन विधेयके संसदेत पास करणाऱ्या केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा निर्णय मागे घ्यावा लागला. शेतकरी उत्पादित मालास स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार कायदेशीर हमीभाव मिळाला पाहिजे. शेती कर्जमाफीसाठी, प्रश्‍न सोडविण्यासाठी आयोगाची स्थापना व्हावी. कांदा निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.

काँग्रेसचे धोरण

बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्नशील राहील. त्यासाठी औद्योगिक विकासाला चालना मिळावी, तसेच नरडाणा, धुळे, मालेगाव व परिसरातील औद्योगिक वसाहतीत रोजगारक्षम प्रकल्पांची संख्या वाढीसाठी पाठपुरावा केला जाईल. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सुरक्षाविषयक कडक कायदे करून अमलात यायला हवे. (latest marathi news)

महागाईचा भडका

महागाईचा प्रश्‍न जटिल असून, घरगुती गॅस सिलिंडर, डिझेल-पेट्रोल, खते, बी-बियाणे, औषधी, सिमेंट आदी वस्तूंचे दर कित्येक पटीने वाढले आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढत आहेत. ते नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. मतदारसंघातील पाणीप्रश्‍नी, सिंचनाच्या समस्या, रस्ते, औद्योगिक विकासासंबंधी समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी सुयोग्य कार्यवाहीसाठी पाठपुराव्यावर भर असेल.

अनुभव पाठीशी

काँग्रेसमधून १९९२ ला सक्रिय झाल्यावर पक्षाची जनरल सेक्रेटरी, धुळे जिल्हा प्रभारी, २००४ मध्ये नाशिक विधानसभा मतदारसंघात आमदार, २००८ मध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री, नाशिकची महापौर, २००८ मध्ये धुळे जिल्हा पालकमंत्री, नाशिक जिल्हा बँकेची उपाध्यक्ष, संचालक, पक्षीय नाशिक शहराध्यक्ष, नगरसेविका, आरोग्य समिती सभापती.

महिला व बालकल्याण समिती सभापती, विधामंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीची अध्यक्ष, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाची संचालक, नाशिकस्थित आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सिनेट मेंबर आदी जबाबदाऱ्या भूषविल्याने अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या बाहेरची नव्हे तर या मतदारसंघाची देणे लागते म्हणून उमेदवारी करत असल्याचे डॉ. बच्छाव सभांमधून सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT