Lok Sabha Election  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या गृहभेटींचे वेळापत्रक जाहीर; धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक

Lok Sabha Election : दिव्यांग मतदार व कोव्हीड-१९ रुग्ण मतदार यांना पथकांच्यामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदार संघासाठी येत्या २० मेस मतदान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीत ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-१९ रुग्ण मतदार यांना पथकांच्यामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्यासाठी गृहभेटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. (Schedule of home visits of senior disabled voters announced )

धुळे ग्रामीण मतदारसंघ

८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रथम गृहभेट प्रक्रिया शुक्रवारी (ता.१०) सकाळी आठपासून सुरू होईल. यात पथक-१ द्वारे सैताळे, निकुंभे, मेहेरगांव, कावठी, चिंचवार, वार, भोकर. पथक-२ द्वारे ढंढाणे, तिसगांव, बिलाडी, धमाणे, विश्वनाथ, शिरडाणे प्र. डा. मोहाडी. पथक-३ द्वारे उडाणे, खेडे, कुसूंबा, चौगांव, गोताणे. पथक-४ द्वारे नांद्रे, देऊर ब्रु., लोणखेडी, लोहगड, पथक-५ द्वारे बाबुळवाडी, पिंपरी, सडगाव, हेंकळवाडी, मोरशेवडी, पाडळदे.

पथक-६ द्वारे अंबोडे, अजंग, काळखेडे, चिंचखेड, अंचाडे तांडा, हडसुणी, इसरणे. पथक-७ द्वारे नरव्हाळ, मोघण, विंचुर, रतनपुरा, धामणगांव, बाबरे या गावात गृहभेटी होतील. तर द्वितीय गृहभेट प्रक्रिया बुधवार (ता.१५) सकाळी आठपासून होईल. यात जे मतदार प्रथम भेटीवेळी घरी आढळून येणार नाहीत. अशा मतदारांसाठी द्वितीय गृहभेट होईल.

धुळे शहर मतदार संघ

प्रथम गृहभेट प्रक्रिया शुक्रवारी (ता.१०) सकाळी आठ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान होईल. यात पथक-१ द्वारे शारदा नगर, देवपूर, दोंदे कॉलनी, आग्रा रोड, देवपूर. पथक-२ द्वारे आग्रारोड देवपूर, वाडीभोकर रोड देवपूर. पथक-३ द्वारे देवपूर. पथक-४ द्वारे देवपूर, स्वस्तिक चित्र मंदिराजवळ. पथक-५ द्वारे स्वस्तिक चित्रमंदिराजवळ, गल्ली नंबर ५, मनोहर चित्र मंदिराजवळ. पथक-६ द्वारे मनोहर चित्र मंदिर, गल्ली नंबर १, मोगलाई साक्री रोड, पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ, मौलवीगंज.(latest marathi news)

पथक-७ द्वारे मोहाडी उपनगर, चाळीसगांव रोड, रेल्वे स्टेशन रोड, चितोड रोड. तर द्वितीय गृहभेट प्रक्रिया सोमवारी (ता.१३) सकाळी आठपासून सुरू होईल. यात जे मतदार प्रथम भेटीवेळी घरी आढळून येणार नाहीत, अशा मतदारांसाठी द्वितीय गृहभेट आयोजित केली जाईल.

शिंदखेडा मतदार संघ

प्रथम गृहभेट प्रक्रिया शुक्रवारी (ता.१०) सकाळी आठपासून होईल. यात पथक-१ द्वारे टाकरखेडा. पथक-२ द्वारे साहुर, नवेकोडदे, कुंभारे, वरपाडे. पथक-३ द्वारे रामी, झिरवे. पथक-४ द्वारे मंदाणे, वणी. पथक-५ द्वारे सुलवाडे, सोनेवाडी, नेवाडे, वर्षी, टेमलाय. पथक-६ द्वारे विकवेल, पढावद, म्हळसर, वडली. पथक-७ द्वारे पिंप्राड, नरडाणा, अजंदे बु., पथक-८ द्वारे गोराणे, पिंपरखेडा, वालखेडा, डोंगरगाव. पथक-९ द्वारे कदाणे, होळ.

पथक-१० द्वारे शिंदखेडा, अलाणे, चौगांव खु॥ पथक-११ द्वारे सवाई मुकटी, शेवाडे, देगांव, विखरण. पथक-१२ द्वारे मालपूर, हट्टी खु., दुसाणे, म्हसाळे, बळसाणे. पथक-१३ द्वारे बाभुळदे, खलाणे, डाबली. तर द्वितीय गृहभेट प्रक्रिया बुधवार (ता.१५) सकाळी आठ वाजेपासून होणार आहे. यात जे मतदार प्रथम भेटीवेळी घरी आढळून येणार नाहीत, अशा मतदारांसाठी द्वितीय गृहभेट आयोजित केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT