Congress leader Pratibha Shinde while informing about programs of Congress leader MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyay Yatra in Dhule city esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : राहुल, प्रियंका गांधींच्या उपस्थितीत 13 ला महिला मेळावा

Dhule : आगामी काळातील काँग्रेस पक्षाचे महिलाविषयक धोरणदेखील जाहीर होणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : भारत जोडो न्याययात्रेच्या माध्यमातून धुळ्यात पोचणारे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह देशभरातील, राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत धुळ्यात १३ मार्चला भव्य महिला मेळावा होत असून, आगामी काळातील काँग्रेस पक्षाचे महिलाविषयक धोरणदेखील जाहीर होणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Dhule Mahila Mela in presence of Rahul Priyanka Gandhi)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेच्या जिल्ह्यातील कार्यक्रमांच्या अनुषंगाने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ९) बाजार समितीत पत्रकार परिषदेत माहिती दिली. मणिपूर येथून सुरवात झालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करत आहे.

यात महाराष्ट्रात प्रवेश करत असताना सीमेलगत असणाऱ्या देवमोगरामाता मंदिरात श्री. गांधी दर्शन घेऊन महाआरती करतील. त्यानंतर ही यात्रा नंदुरबार येथे पोचून तिथे जाहीर सभा होईल, तर रात्री दोंडाईचा येथे मुक्कामाला ते पोचतील. माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, वसंतराव सूर्यवंशी.

किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तमराव देसले, तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, कार्याध्यक्ष दीपक साळुंके, शहराध्यक्ष सचिन सोनवणे, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत भामरे, पंचायत समिती सभापती शांताराम कुवर.

सदस्य रमेश गांगुर्डे, प्रज्योत देसले, प्रवीण चौरे, गणेश गावित, नंदकुमार खैरनार, याकूब पठाण, सागर देसले, कपिल जाधव, संदीप भोये, पंकज सूर्यवंशी, पी. एस. पाटील, अविनाश शिंदे, कुंदन गांगुर्डे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतिस्मारकाला अभिवादन

१३ मार्चला धुळ्याकडे यात्रा मार्गस्थ होईल. यादरम्यान चिमठाणे येथील क्रांतिस्मारकाला अभिवादन करण्यात येणार आहे. धुळे शहरात कॉर्नर सभा होऊन, १३ मार्चला खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह देशभरातील व राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, नेत्यांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा होणार आहे.

हिला मेळाव्यात काँग्रेस पक्षाचे महिला धोरण देखील जाहीर केले जाणार असल्याने या ऐतिहासिक सभेस जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने महिलांसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रतिभा शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT