District Superintendent Agriculture Officer K. S. While giving a statement to Shirsath, District Organizer Prof. Chandrakant Daga, District Secretary S. M. Patil, Dhule City President Adv. Chandrakant Yeshirao etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शेतकऱ्यांना बियाणे वाजवी दरात उपलब्ध करून द्या; ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी

सकाळ वृत्तसेवा

शिंदखेडा : जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी बियाणे वाजवी दरात कृषी विभागाने उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र धुळे जिल्हा शाखेने केली आहे. या मागणीबाबतचे निवेदनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी धुळे यांच्याशी चर्चा करून देण्यात आले. (Dhule Make seeds available to farmers at reasonable prices)

निवेदनात एकाच कंपनीचे बियाणे वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळ्या दराने विकली जात आहेत. त्यामुळे बी बियाणे कंपन्यांच्या फायदा होऊन करोडो रुपयांची कमाई करीत असल्याचा आरोप आहे. सर्व बियाणे उत्पादन कंपन्यांची बियाणांचे दर हे पॅकिंग व वजनानुसार कृषी विभागाने दरवर्षी प्रसिद्ध करावेत.

हे दर प्रसिद्ध केल्यास शेतकरी वर्गाला बियाणे दरातील फरकामुळे होणारी फसवणुकीला आळा बसेल. कंपनीची एमआरपी ही अवाच्या सव्वा छापलेली असते. त्यामुळे शेतकरी लुबाडला जातो. २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा झाल्यानंतर ग्राहकाला योग्य ते संरक्षण मिळाले.

परंतु ग्राहक म्हणून असलेल्या हक्काची फारशी माहिती नागरिकांना नाही. सदोष बियाणे, वस्तूत केलेली भेसळ, कालबाह्य झालेल्या वस्तू, भुलभुलैया जाहिराती आदींद्वारे ग्राहकांची फसवणूक होते. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पिकाच्या लागवडीसाठी केलेल्या सर्व खर्चाबरोबरच पिकाचा हंगामही वाया जाऊन मोठे आर्थिक नुकसान होते. (latest marathi news)

ग्राहकांनीही जागृत राहून बियाण्यांची खरेदी करावी बियाणे घेताना पक्के बिल घ्यावे, ते सांभाळून ठेवावे तसेच बियाणांची पेरणी करताना थोडे दाणे त्याच पिशवीत ठेवून पिशवी बंद करून पिकेपर्यंत सांभाळून ठेवावी फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.

निवेदनावर विभागीय अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष ॲड. जे. टी. देसले, उपाध्यक्ष डॉ. एन. के. वाणी, प्रा. चंद्रकांत डागा, एस. एम. पाटील, पी. झेड. कुवर, आशा रंधे, राजेंद्र भंडारी, एम. टी. गुजर, डॉ. चंद्रकांत येशिराव, ईश्वर बारी, जगदीश बोरसे, भास्कर पाटील, प्राचार्य बी. एम. भामरे, आर. एम. भंडारी, माजी प्राचार्य पी. व्ही. दीक्षित, प्रशांत पाकळे यांच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT