कापडणे (धुळे) : येथील ग्रामपंचायतीची (kapdane gram panchayat dhule) विकासाकडे घोडदौड सुरू असून, उत्पन्नवाढीसाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच आता पाणीपट्टी दुप्पट करून घरोघरी वसुलीच्या पावत्या पोच केल्या आहेत. ऑक्टोबरपर्यंत कर भरल्यास पाच टक्के सूट व न भरल्यास पाच टक्के दंड आकारणार असल्याचे नोटीसमध्ये बजावले आहे. विशेष म्हणजे, सूट पाणीपट्टीवर न लावता घरपट्टीवर लावली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीतील ग्रामसभेत पाणी कर न वाढविण्याचा ठराव मंजूर झाला होता. तरीही गेल्या वर्षापासूनच करवाढ लादल्याच्या पावत्या वितरित केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. तर वाढीव करामुळे ग्रामपंचायतीच्या (Gram pnchayat tax recovery) तिजोरीत सुमारे चौदा लाख रुपये पडणार आहेत. (kapdane-gram-panchayat-yax-recovery-water-bill-double)
येथील ग्रामपंचायतीची पाणीपट्टी ही वार्षिक ३६० रुपये होती. ती आत ७२० रुपये केली आहे. सुमारे दोन हजार कुटुंबांकडे नळजोडणी आहेत. आता हर घर नल योजनेमुळे नळजोडणी वाढले आहेत. वाढीमुळे पाणी करातून सुमारे चौदा लाखांचा महसूल जमा होणार आहे. मात्र कमी कर असतानाही वसुली पन्नास टक्क्यांच्या आतच आहे. कर वाढवून थकबाकी वाढविण्याचा प्रयत्न सफल होणार असल्याचे चर्चिले जात आहे. २६ जानेवारी २०२० व त्यापूर्वीच्या ग्रामसभांमध्ये पाणी कर वाढविण्यास ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप नोंदविला आहे. ठराव मंजूर होऊ दिलेला नाही. तरीही वाढीव कर कसा लावला, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
..म्हणे शासनाचा जीआर
वाढीव पाणीपट्टीबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत शासन निर्णयानुसार कर वाढविल्याचे सांगण्यात आले. मात्र ठराव नामंजूर असताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता वाढीव कर लादणे म्हणजे अन्यायकारकच असल्याचे कन्हय्या विधायक ग्रुपचे दत्तात्रेय पाटील यांनी सांगितले.
घरपट्टी व पाणपट्टी वाढीसाठी ग्रामसभा ही प्रभावी असते. मागील ग्रामसभा जानेवारी २०२० मध्ये झाली होती. त्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी घरपट्टी व पाणपट्टीवाढीला विरोध दर्शविला होता. आता कोरोनासारख्या महामारीत घरपट्टी, पाणीपट्टी वाढ योग्य नाही. बऱ्याच भागात पाणीपुरवठाही पूर्ण दाबाने होत नाही.
-चेतन पाटील, युवा सामाजिक कार्यकर्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.