Dignitaries present with the winners of the Dhule Marathon at the police drill ground. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Marathon 2024 : धावपटूंच्या कर्तृत्वाला धुळेकरांचा सलाम! ‘मॅरेथॉन’चे जल्लोषात पारितोषिक वितरण

पोलिस कवायत मैदानावर रविवारी (ता. ४) जल्लोषात पारितोषिक वितरणाचा सोहळा पार पडला.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील धुळे मॅरेथॉन २०२४ (सीझन २) स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने आणि त्यात हजारो स्पर्धक धावल्याने त्यांच्यासह विजेत्यांच्या कार्यकर्तृत्वाला असंख्य धुळेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलाम केला.

पोलिस कवायत मैदानावर रविवारी (ता. ४) जल्लोषात पारितोषिक वितरणाचा सोहळा पार पडला. यात विविध वयोगटातील महिला व पुरुष स्पर्धकांना एस. कांतिलाल या ज्वेलर्सतर्फे साडेतीन लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे दिली गेली. (Dhule Marathon 2024 Dhulekar salutes the achievements of runners Prize distribution)

पोलिस कवायत मैदानावरून सकाळी सहाला स्पर्धेला सुरवात झाली. यात २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटरची ड्रीम रन आणि ३ किलोमीटरची फॅमिली रन असे चार गट होते. मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून स्पर्धेला प्रारंभ झाला.

जिल्हाधिकारी अनिवल गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, सीईओ शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, ब्रॅन्ड अम्बेसेडर संग्राम सिंग, कविता राऊत, क्रांती साळवे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर,

रोटरी क्लब डिस्ट्रिकचे पब्लिक इमेज चेअरमन मितेश भट, क्रीडाधिकारी कार्यालयाचे योगेश पाटील आणि आयोजन समितीप्रमुख अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,

उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, गृह शाखेचे उपअधीक्षक धनंजय पाटील, ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, आशिष अजमेरा, आशिष पटवारी, संग्राम लिमये, दीपक अहिरे, डॉ. राहुल बच्छाव, निखिल सूर्यवंशी, स्पर्धा समन्वयक सहाय्यक पोलिस अधिकारी पंडित सोनवणे आदी उपस्थित होते.

विजेत्यांना उपस्थित मान्यवरांसह शुभी अभिनय गोयल, सानिका श्रीकांत धिवरे, वैशाली किशोर काळे, ईशा शुभम गुप्ता, जान्हवी हृषीकेश रेड्डी यांच्या हस्ते महिला स्पर्धकांना पारितोषिक वितरण झाले.

२१ किलोमीटरतील विजेते

स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे ः वयोगट १८ ते ३५ ः २१ किलोमीटर- दिनेश पाटील (१ तास ९ मिनिट ४२ सेकंद), भगतसिंग वळवी (१ तास १३ मिनिट ९ सेकंद), संजय मारुती (१ तास १३ मिनिटे ४१ सेकंद), ३६ ते ५० वयोगट- केशरिया मोना (१ः२५ः५७), संतू जीवा (१ः२८ः१८), संतोष गिरीजाराम (१ः३१ः०२), वयोगट ५० व पुढे- मोहन देशपांडे (२ः१ः८), संजय देवराम (२ः५ः१६), विनोद भदाणे (२ः१०ः२०), वय १८ ते ३५ ः प्रणाली संजय (१ः३०ः२३), आरती अर्जुन (१ः३०ः२४), शेवंता तुळशीराम (१ः३१ः५५), वयोगट ३६ ते ५० वर्षे- अश्‍विनी गोकुळ देवरे (१ः५६ः०६), डॉ. ममता (२ः१९ः१५), ममता संग्राम (३ः१ः५१). (अन्य निकाल ः उद्याच्या अंकी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT