Dhule News : येथील अवधान शिवारातील विकसनशील एमआयडीसीला सद्यःस्थितीत चार दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी लागते. त्यात अडीच एमएलडी पाणी वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात एमआयडीसीला साडेसहा दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकेल.
त्यासाठी हरण्यामाळ तलावातून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाईल. याकामी सरासरी २६ कोटी ४१ लाखांच्या निधीतील या योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
योजनेच्या कामाला लवकरच सुरवात होईल. त्यामुळे एमआयडीसीतील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकेल. (Dhule MIDC Approval of 26.41 crores for new scheme on Haranmal Lake Availability of six and a half million liters of water Dhule News)
एमआयडीसीतील कामगारांसह कारखानदारांना मोती नाल्यावरील धरणातून वापर आणि उद्योगासाठी पाणीपुरवठा केला जातो.
मात्र, काही वर्षांपासून या औद्योगिक वसाहतीत प्रकल्पांची संख्या वाढत असल्याने कामगार आणि औद्योगिक वापराच्या पाणी वापरात वाढ होत आहे. त्यामुळे सध्याची पाणीपुरवठा योजना एमआयडीसीसाठी अपुरी ठरते आहे.
याबाबत २८ ऑगस्ट २०२२ ला उद्योगमंत्री उदय सामंत शहरात आले असता खानदेश चेंबर ऑफ कॉमर्स, खानदेश औद्योगिक विकास परिषदेतर्फे मुख्य प्रवर्तक तथा उद्योजक नितीन बंग, राजेश गिंदोडिया यांनी साकडे घातले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाठपुराव्याला यश
चर्चेत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेपेक्षा हरण्यामाळ तलवासंबंधी योजना कशी योग्य आहे यासंबंधी ऊहापोह झाला होता. सततच्या पाठपुराव्यानंतर मंत्री सामंत यांनी हरण्यामाळ तलावाच्या नूतन योजनेला मंजुरी दिली आहे.
त्यामुळे एमआयडीसीतील विस्तारित वसाहतीचा प्रश्न निकाली निघेल. पाणीपुरवठा सुरळीत होईल आणि दर्जाही सुधारेल. शिवाय, औद्योगिक वसाहतीतील कारखानदार व कामगारांसह परिसरातील जनतेची पाणीटंचाईच्या समस्येतून सुटका होण्यास हातभार लागेल.
सुमारे २६ कोटी ४१ लाखांच्या निधीतील या योजनेंतर्गत दहा किलोमीटरची ४५० एमएम व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येईल. त्यातून २.५ दशलक्ष लिटरचा (एमएलडी) जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाईल. पंपिंग मशिनचे नूतनीकरण केले जाईल. तसेच जॅकवेलमध्ये बदल केले जातील.
कारखानदार समाधानी
या योजनेसाठी प्रशासकीय इमारतीस यापूर्वी मार्च २०२३ मध्येच मंजुरी मिळाली होती. इतरही सर्व बाबींवर शासन तातडीने कार्यवाही करेल, असा विश्वास श्री. बंग यांनी व्यक्त केला.
या योजनेच्या मंजुरीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे, तत्कालीन कार्यकारी अभियंता एम. एस. पाटील, उपअभियंता स्वप्नील पाटील यांचे सहकार्य लाभले.
खानदेश चेंबर ऑफ कॉमर्स व खानदेश औद्योगिक विकास परिषदेतर्फे येथील एमआयडीसीतील अडचणींबाबत दिलेल्या निवेदनावर मंत्री सामंत यांनी अंमलबजावणी केल्याने कारखानदारांनी समाधान व्यक्त करीत आभार मानले.
"हरण्यामाळ तलावातून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास मान्यता दिल्याचे शासनाने कळविले आहे. धुळे एमआयडीसीला मिळणारे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे. ते कारखानदारांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही.
नवीन पाणी योजनेमुळे पाण्याची प्रत सुधारेल. तसेच उपलब्धता वाढीमुळे नवीन उद्योग येतील. यापुढे अडीच एमएलडी पाणी वाढेल. त्यामुळे एमआयडीसीला साडेसहा एमएलडी पाणी उपलब्ध होईल."
- नितीन बंग, मुख्य प्रवर्तक, खानदेश औद्योगिक विकास परिषद
"नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केल्यामुळे धुळे औद्योगिक वसाहतीत मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानतो. पाण्याच्या तुटवड्यामुळे एमआयडीसीत येण्यास अनेक उद्योजक उत्सुक नव्हते.
ते लक्षात घेता मंत्री सामंत यांच्याकडे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी मागणी केली होती. त्याची दखल घेत पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी दिली गेली आहे. उद्योजक संघटनेने अनेकवेळा याबाबत मागणी करूनही प्रशासन दाद देत नव्हते."
- फारुक शाह आमदार, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.