Speaking on occasion of laying foundation stone of the railway station, underpass work, MP Dr. Subhash Bhamre. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण, 24 ठिकाणी अंडरपास : खासदार डॉ. भामरे

Dhule : देशभरातील एक हजार ५०० रोड ओव्हर ब्रिज व अंडरपास कामांचे औपचारिक शिलान्यास तथा लोकार्पण सोमवारी (ता. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत धुळ्यासह देशभरातील ५५४ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास, सुशोभीकरणासह देशभरातील एक हजार ५०० रोड ओव्हर ब्रिज व अंडरपास कामांचे औपचारिक शिलान्यास तथा लोकार्पण सोमवारी (ता. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले.

दरम्यान, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्याने धुळे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल साडेनऊ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. (Dhule Modernization of railway station and underpass at 24 places)

केंद्र सरकारच्या ४१ हजार कोटींच्या निधीतून धुळे शहरातील रेल्वेस्थानकासह देशभरातील ५५४ स्थानके आणि रेल्वेमार्गांवरील एक हजार ५०० हून अधिक ओव्हरब्रिज आणि अंडरपासच्या कामांचे लोकार्पण पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले.

त्यानिमित्त सोमवारी (ता. २६) सकाळी अकराला येथील रेल्वेस्थानकात झालेल्या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर प्रदीप कर्पे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते.

धुळे रेल्वेस्थानचा कायापालट

खासदार डॉ. भामरे याप्रसंगी म्हणाले, की पंतप्रधान मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सहकार्यामुळे व सततच्या पाठपुराव्यामुळे देशभरातील अमृत भारत स्टेशन विकास योजनेत धुळे स्थानकाचा समावेश करून घेण्यात यश मिळाले. यात धुळे रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण होत असून, प्रवाशांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. आधुनिकीकरणासाठी आपण साडेनऊ कोटी निधी मिळविला. या निधीतून विविध कामे सुरू आहेत.

२४ अंडरपास, ओव्हरब्रिज

खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले, की धुळे येथील रेल्वेस्थानकातून मुंबईसाठी १८ डब्यांची रेल्वेगाडी रोज धावते आहे. तसेच दिवसातून तीन वेळा धुळे-चाळीसगावदरम्यान मेमू ट्रेनही धावते आहे. तसेच आपल्या प्रयत्नाने धुळे-चाळीसगाव रेल्वेमार्गाचे संपूर्ण विद्युतीकरणही झाले आहे. (latest marathi news)

धुळे-चाळीसगावदरम्यान धुळे शहरासह मोहाडी, सावळदे, बोरविहीर, शिरूड, चांदे, मोरदडतांडा येथे १५ गेटवर अंडरपासचे काम होत आहे. यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.

तसेच शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा, होळ, मेथी, शिंदखेडा, दोंडाईचा व सोनशेलू येथील नऊ गेटसाठी ३६ कोटी असा एकूण ७७ कोटी रुपयांचा निधीही प्राप्त करून घेतला असून, या कामांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिलान्यास होत आहे. या वेळी रेल्वेचे नोडल ऑफिसर शरद कोटेचा, दयाशंकर द्विवेदी, स्थानक अधीक्षक संतोष जाधव, नंदकुमार पाटील, भुसावळचे मुख्य कार्यालयीन अधीक्षक उमाकांत बावस्कर आदींनी संयोजन केले.

विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच रेल्वे विभागातर्फे झालेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना खासदार डॉ. भामरे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. श्री. बावस्कर यांनी सूत्रसंचालन केले.

सहा महिन्यांत धुळे-पुणे रेल्वे

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की जिल्हावासीयांच्या मागणीनुसार आता धुळे ते पुणे या रेल्वेसाठीही रेल्वेमंत्री वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्यासह वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत आहोत. येत्या सहा महिन्यांत धुळे-पुणे रेल्वेही धावू लागेल, अशी ग्वाही खासदार डॉ. भामरे यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT