jamkhedi dam dhule file photo esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Monsoon Rain Update : जिल्ह्यातील प्रकल्पांत 40 टक्के साठा! बहुतांश गावांची पाणीटंचाई दूर

Monsoon Rain Update : लघु प्रकल्प २८ टक्के व मध्यम प्रकल्प ४४ टक्के भरले आहेत. त्यामुळे सध्या बहुतांश गावांची पाणीटंचाई दूर झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील धरणांत ४० टक्के जलसंचय झाला आहे. लघु प्रकल्प २८ टक्के व मध्यम प्रकल्प ४४ टक्के भरले आहेत. त्यामुळे सध्या बहुतांश गावांची पाणीटंचाई दूर झाली आहे. (Monsoon Rain Update 40 percent stock in dams)

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३८५.५ मिलिमीटर म्हणजे सरासरी १३१.८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात धुळे तालुक्यात सर्वांत जास्त ४०६.५ मिलिमीटर (१४६.४ टक्के) पाऊस झाला असून, शिरपूर तालुक्यात तुलनेने सर्वांत कमी ३५८.३ मिलिमीटर (१००.९ टक्के) पाऊस झाला आहे.

साक्री तालुक्यात ३६२.७ मिलिमीटर (१४० टक्के), शिंदखेडा तालुक्यात ४०३.४ मिलिमीटर (१३१.८ टक्के) पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ४४ लघु प्रकल्प व १२ मध्यम प्रकल्प असून, लघु प्रकल्पात ३१.३०४ दशलक्ष घनमीटर, तर मध्यम प्रकल्पात १४४.३० दशलक्ष घनमीटर पाणी आहे.

मध्यम प्रकल्पातील मालनगाव व जामखेडी धरण १०० टक्के भरली आहेत. अमरावती धरणात केवळ मृतसाठा आहे. पाच प्रकल्प ५० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी लघु प्रकल्पात १९ टक्के व मध्यम प्रकल्पात ४१ टक्के असा ३५ टक्के साठा होता. त्या तुलनेत यंदाची स्थिती समाधानकारक असली तरी लहरी पावसाचा अनुभव लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक आहे. (latest marathi news)

प्रकल्प, जलसाठा दलघमीमध्ये, टक्केवारी

पांझरा २७.०५ ७६

मालनगाव ११.३२ १००

जामखेडी १२.३४ १००

कनोली ३.७५ ४४

बुराई ८.८२ ६२

करवंद १५.७८ ८६

अनेर १६.९० ३४

सोनवद १.७३ १२

अमरावती ०.०० ००

सुलवाडे १९.९३ ३१

अक्कलपाडा २०.४० ४७

वाडीशेवाडी ६.२८ १९

एकूण मध्यम प्रकल्प ः १४४.३० ४४

एकूण लघुप्रकल्प ः ३१.३०४ २८

एकूण जिल्हा ः १७५.६० ४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT