A woman sitting in the bus stand area selling karvanda esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पिंपळनेरमध्ये डोंगराची काळी मैना दाखल! रानमेव्याची दररोज हजारो-लाखो रुपयांची उलाढाल

Dhule News : डोंगराची काळी मैना म्हणजे करवंद, जांभूळ, आंबा यांची मोठी आवक होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

वार्सा : पिंपळनेर (ता. साक्री) ही साक्री तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ मानली जाते. या ठिकाणी दररोज हजारो-लाखो रुपयांची उलाढाल होते. सध्या पिंपळनेर शहरात रानमेवा विक्रीसाठी येत आहे. डोंगराची काळी मैना म्हणजे करवंद, जांभूळ, आंबा यांची मोठी आवक होत आहे.

सकाळी सकाळी पश्चिम पट्ट्यातून करवंद, आंबा, जांभूळ, विक्रीसाठी घेऊन येतात. सध्या हंगाम नुकताच सुरू झाल्याने १५ ते २० करवंदाच्या पाट्या, तीन ते चार जांभळाच्या, तसेच ४० ते ५० आंब्याच्या पाट्या येतात. जांभूळ व करवंद जंगलातून सापडतात, तर अनेक शेतकऱ्यांनी पश्चिम पट्ट्यात आंबावाडी लावल्या आहेत. (Pimpalner Daily turnover of karawand thousands to lakhs of rupees)

पश्चिम पट्ट्यात करवंदाच्या जाळ्यांचे जंगल मोठ्या प्रमाणात आहे. करवंदे एकेक तोडून गोळा करावी लागतात. त्यामुळे एका दिवसात दोन ते तीन महिलांकडून एक टोपले (१० ते १५ किलो) तोडले जात असतील. करवंद तोडणे फार जिकिरीचे असल्याचे सांगितले जाते. करवंदाच्या झाडाला मोठमोठे काटे असतात. जाळ्यांवर चढून किंवा शिडीच्या सहाय्याने करवंद तोडली जातात. ती एकत्र गोळा करून सकाळी पिंपळनेर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात.

करवंद, जांभूळ खरेदीसाठी व्यापारी पहाटेच येतात. धुळे, साक्री, कासारे, धाडणे, दहिवेल, निजामपूर, मालेगाव, पिंपळनेर, नेर, नंदुरबार, नवापूर, दोंडाईचा, कासारे, ताहाराबाद येथील व्यापारी खरेदीसाठी येतात. पश्चिम पट्ट्यात अनेक गावांतील जंगलात करवंदाच्या जाळ्या आहेत. त्यात सिताडी, वार्सा, शिनपाडा, उमरपाडा, शेंदवड, मांजरी, बारीपाडा, महुपाडा अशा अनेक ठिकाणी डोंगराची काळी मैना पाहायला व खायलादेखील मिळते. (latest marathi news)

असे आहेत भाव

पिंपळनेर येथून बाहेरगावाहून येणारे व गावातील व्यापारीदेखील खरेदी करतात. एखाद्या वेळेस आवक जास्त असते, तर एखाद्या वेळेला कमी. आवक वाढली तर भाव कमी मिळतो, कमी आवक राहिली तर जास्त असतो. रविवारी सकाळी ५०० ते ६०० रुपयांना एक टोपले (पाटी), (१२ ते १५ किलो) वजनी ६० ते ८० रुपये किलो, तर मापी ३० ते ४० रुपये पावशेर असे दिले जातात. जांभळाची पाटी १००० ते ११०० रुपयांना मिळते व किरकोळ विक्रीसाठी १०० ते १२० रुपये किलोने मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT