Dr. Shobha Bachhav and officers present at the work review meeting in Public Works Department.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रस्ते विकासासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवावा : खासदार डॉ. बच्छाव

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील रस्ते, महामार्ग, सिंचन प्रकल्पांविषयी माहिती खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी सोनगीर ते दोंडाईचा मार्गाचा विकास आणि धुळे शहरात पांझरा नदीकिनारी दुतर्फा रस्ते विकासाची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यासंदर्भात त्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची सूचनाही दिली. (MP Dr. shobha bachhav statement Drinking water problem should be solved with road development)

येथील दौऱ्यात खासदार डॉ. बच्छाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, तापी पाटबंधारे विकास महामंडळ या विभागांची आढावा बैठक घेतली. त्यांनी विकास कामांची माहिती घेणे, शासन दरबारी प्रलंबित कामांच्या पाठपुराव्यासाठीची तयारी करणे, नवीन कामांचा समावेश करणे यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. त्यात अनेक विकास कामांना गती देण्याची सूचना त्यांनी दिली आहे.

बांधकाम विभाग

खासदार डॉ. बच्छाव यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीसह शहर व जिल्ह्यातील विविध रस्ते, दोन ब्रिटिशकालीन पुलाबाबत सादरीकरण केले. शहरातील कुमारनगर ते महिंदळे या सुरत महामार्गापर्यंत पांझरा नदीच्या दुतर्फा नवीन रस्ता करण्यावर चर्चा झाली.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला सोनगीर ते दोंडाईचा रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, तसेच त्याचे काम कसे लवकर मार्गी लागेल याविषयी सूचना दिल्या. टोलनाक्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात आली. (latest marathi news)

सिंचन प्रकल्पांची स्थिती

तापी पाटबंधारे महामंडळाकडून सुलवाडे जामफळ धरण, प्रकाशा- बुराई प्रकल्प, वाडी- शेवाडी प्रकल्प, अक्कलपाडा धरण, नकाणे तलाव, हरणमाळ तलाव, डेडरगाव तलाव आदी सर्व सिंचन प्रकल्पांची खासदारांनी माहिती घेतली. सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन प्रकल्प लवकर पूर्ण करावा, असेही निर्देश देताना डॉ. बच्छाव यांनी धुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाताळला. डॉ. दिनेश बच्छाव.

विलास गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, प्रदेश सदस्य युवराज करनकाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के. डी. पाटील, प्रकाश पाटील, गणेश गर्दे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता खांडेकर, कार्यकारी अभियंता अमरदीप पाटील.

राहुल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक अजय यादव, सहायक अभियंता हितेश अग्रवाल, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT