Speaking on the Bhumi Puja of the business complex at the place near the Dussehra ground, MP Dr. Subhash Bhamre. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : व्यापारी संकुलामुळे मनपाला उत्पन्नाचा स्रोत : खासदार डॉ. सुभाष भामरे

Dhule : शहरातील भूमाफियांनी तत्कालीन भूमिअभिलेख अधिकाऱ्यांशी संगनमत करत महापालिकेचे अनेक भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील भूमाफियांनी तत्कालीन भूमिअभिलेख अधिकाऱ्यांशी संगनमत करत महापालिकेचे अनेक भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सातत्याने तीन ते चार वर्षे पाठपुरावा करत दसेरा मैदानालगतचा मोक्याच्या जागेवरील भूखंड भूमाफियांच्या घशातून खेचून आणला. (Dhule MP Dr Subhash Bhamre statement Source of municipal income due to business complex)

त्यामुळेच आज त्या जागेवर व्यापारी संकुल साकारत असून, याद्वारे महापालिकेला उत्पन्नाचा आणखी एक स्रोत उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. येथील दसेरा मैदानालगत महापालिकेच्या भूखंडावरील व्यापारी संकुलाचे भूमिपूजन शनिवारी (ता. ९) सकाळी खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले.

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव,

ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, मनपाचे अभियंता कैलास शिंदे, भीमसिंह राजपूत, भारती माळी, अल्पा अग्रवाल, विजय पाच्छापूरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. खासदार डॉ. भामरे म्हणाले, की धुळे शहरातील अनेक भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा केल्याचे दिसून येते. दसेरा मैदानालगतचा असाच महापालिकेचा एक भूखंड भूमिअभिलेखच्या तत्कालीन अधिकाऱ्यांशी संगनमत करत भूमाफियांनी घशात घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ही बाब गजेंद्र अंपळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तसा पाठपुरावा सुरू केला. तसेच आपल्या कानावर ही बाब घातल्यानंतर संबंधित भूमिअभिलेख अधिकाऱ्याला बोलावून घेतले व नियमाप्रमाणे हा भूखंड महापालिकेच्या नावावर केला नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, अशी तंबी दिली. त्यानंतरच हा भूखंड महापालिकेच्या नावावर झाला. यासाठी अंपळकर यांना आयुक्त अमिता दगडे-पाटील व अभियंता शिंदे यांचे सहकार्य लाभले.

पाठपुराव्यामुळे भूखंड परत

महापालिकेचा दसेरा मैदानालगतचा भूखंड भूमाफियांनी हडप केला होता. मात्र, खासदार डॉ. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत साडेचार वर्षे पाठपुरावा केल्यानंतर हा भूखंड पुन्हा महापालिकेच्या ताब्यात आल्याचे श्री. अंपळकर म्हणाले. श्री. कदमबांडे यांनी भूमिपूजन होत असलेल्या व्यापारी संकुलामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. श्री. शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. श्याम पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT