Municipal team while collecting tax from property owner. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : 1 मालमत्ता सील, 3 नळ बंद; मनपा पथकांची कारवाई

महापालिकेच्या सहा पथकांनी मंगळवारी (ता. १३) सुमारे १८ लाख मालमत्ता कर व सुमारे दोन लाख पाणीपट्टी असे एकूण २० लाख रुपये करवसुली केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : महापालिकेच्या सहा पथकांनी मंगळवारी (ता. १३) सुमारे १८ लाख मालमत्ता कर व सुमारे दोन लाख पाणीपट्टी असे एकूण २० लाख रुपये करवसुली केली. दरम्यान, एका पथकाने थकबाकीदाराची एक मालमत्ता सील केली, तर एका पथकाने तीन नळकनेक्शन बंद केले.

महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून चालू मागणीसह थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कर वसुली व कारवाई मोहीम सुरू केली आहे. (dhule Municipal Corporation has started tax collection and action campaign for recovery of arrears news)

यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या निर्देशानुसार सात पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, मालमत्ता कर विभागासह इतर विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची या पथकांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकांनी सोमवार (ता. १२)पासून करवसुलीसह कारवाई सुरू केली. पहिल्या दिवशी सुमारे २० लाख रुपये करवसुली झाली.

त्यानंतर मंगळवारी (ता. १३) दुसऱ्या दिवशी १८ लाख ६६ हजार १५३ रुपये मालमत्ता कर, तर एक लाख ९३ हजार ५५१ पाणीपट्टी असे एकूण २० लाख ५९ हजार ७०४ रुपये वसुली करण्यात आली.

सहा पथकांकडून ही कार्यवाही झाली. दरम्यान, एका पथकाने एक मालमत्ता सील केली, तर अन्य एका पथकाने तीन नळ कनेक्शन बंद केले. हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे.

मार्च-२०२४ अखेर जास्तीत जास्त करवसुलीसाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. थकबाकीदारांना दिलासा मिळाला यासाठी मालमत्ता करावरील शास्ती (दंड) शंभर टक्के माफ करण्यात आला आहे.

या शास्ती योजनेचाही थकबाकीदारांनी लाभ घ्यावा व कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेतर्फे वारंवार करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT