Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: धुळे महापालिकेत प्रथमच ‘पथविक्रेता समिती’! समिती गठित करण्यात धुळे मनपा राज्यात दुसरी, नाशिक विभागात पहिली

Dhule News : पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनिमय) अधिनियम २०१४ नियम १४ (२) अंतर्गत एकूण आठ पथविक्रेत्यांच्या सदस्यांची पंचवार्षिक निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्यासाठी धुळे महापालिकेतर्फे कार्यक्रम घोषित करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या इतिहासात अखेर पथविक्रेता समिती गठीत करण्याची कार्यवाही धुळे महापालिकेने केली. समितीच्या आठ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत आठही सदस्य बिनविरोध निवडून आले. पथविक्रेता समिती गठीत करण्याबाबत धुळे महापालिका राज्यात दुसरी, तर नाशिक विभागात पहिली ठरल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. (Dhule Municipal Corporation Road Vendor Committee)

पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनिमय) अधिनियम २०१४ नियम १४ (२) अंतर्गत एकूण आठ पथविक्रेत्यांच्या सदस्यांची पंचवार्षिक निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्यासाठी धुळे महापालिकेतर्फे कार्यक्रम घोषित करण्यात आला.

त्यानुसार १२ जुलै २०२४ ला मतदार यादी प्रसिद्ध करणे, १५ ते १६ जुलैदरम्यान नामनिर्देशनपत्र वाटप, २२ ते २३ जुलैदरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकृती, २४ जुलैला नामनिर्देशनपत्रांची छाननी, २५ जुलैला नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिद्ध करणे, ३० जुलैला आक्षेप अर्ज स्वीकृती व वैध नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिद्ध करणे, २ ऑगस्टला नामनिर्देशनपत्र मागे घेणे व १८ ऑगस्टला मतदान असा हा निवडणूक कार्यक्रम होता.

आठ जागा, आठच अर्ज

निवडणूक प्रक्रियेत २३ जुलैपर्यंत एकूण आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची २४ जुलैला छाननी करण्यात आली. यात आठही अर्ज वैध ठरले. २ ऑगस्टला नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत होती. मात्र, या मुदतीत एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले नाही. (latest marathi news)

शिवाय आठ जागांसाठी आठच अर्ज असल्याने आठही उमेदवारांची निवड घोषित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सह आयुक्त (जिल्हाधिकारी कार्यालय) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही निवडप्रक्रिया झाली. धुळे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त समीर शेख सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी होते.

धुळे मनपा निवडणूक विभागाचे कार्यालयीन अधीक्षक रमजान अन्सारी, शहर व्यवस्थापक गणेश खोंडे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले. पथविक्रेता समिती सदस्य निवडणुकीच्या या कामाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी संबंधितांचे अभिनंदन केले. दरम्यान, पथविक्रेता समितीत इतर विविध विभागांचे अधिकारीही सदस्य म्हणून असतात.

बिनविरोध सदस्य असे

सुरेश हिरालाल गोपाल, विजय एकनाथ साबळे (सर्वसाधारण घटक), ज्योती रमेश कोळी (सर्वसाधारण महिला), रीना सुनील सामुद्रे (अनुसूचित जाती), वाल्मीक दिनकर चव्हाण (अनुसूचित जमाती), चंद्रकांत रामचंद्र सोरमारे इतर मागास वर्ग), अंजुम अजहरोद्दीन शहा (अल्पसंख्याक महिला), अंबादास धुडकू गुरव (विकलांग घटक).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT