Dhule News : राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण २२ हजार ५६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २४ कोटी ९४ लाख ९० हजार ८१९ रुपये तडजोड रक्कम वसूल झाली. धुळे महापालिकेचा सुमारे सव्वा कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद, न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप वि. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे कामकाज चालले. (24 crore 94 lakh recovered from public court)
राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात २७ जुलैला राष्ट्रीय लोकअदालत झाली. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित चार हजार ९७१ प्रकरणे व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे सुमारे ८० हजार ३६७ अशी एकूण ८५ हजार ३३८ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यांपैकी प्रलंबित ५१५ व न्यायालयात दाखलपूर्व एकूण २२ हजार ५६५ प्रकरणे निकाली निघाली.
या प्रकरणांमध्ये एकूण २४ कोटी ९४ लाख ९० हजार ८१९ रुपये तडजोड रक्कम वसूल झाली. मोटार अपघात नुकसानभरपाईची एकूण १०९ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्याद्वारे आठ कोटींवर रक्कम पक्षकारांना मिळवून देण्यात आली. या लोकअदालतीसाठी सर्व न्यायाधीश, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व सदस्य, पक्षकार, तालुका वकील संघ, पोलिस, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
मनपा तिजोरीत सव्वा कोटी
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मालमत्ता कर थकबाकीची प्रकरणेही ठेवण्यात आली. यासाठी महापालिकेने मालमत्ता करावरील शास्ती (दंड) १०० टक्के माफ करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार थकबाकीदारांना लोकअदालतीमध्ये भाग घेऊन थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात थकबाकीदारांनी एकरकमी थकबाकी भरल्यानंतर त्यांना १०० टक्के शास्तीमाफीचा लाभ मिळाला. (latest marathi news)
दिवसभरात शहर विभागातून ४११ मालमत्ताधारकांनी एकूण ४४ लाख ७५ हजार ८८ रुपये कराचा भरणा केला. यातून १९ लाख ९१ हजार ४७० रुपये शास्तीमाफी मिळाली. तसेच हद्दवाढ भागातून १५१ मालमत्ताधारकांनी ६२ लाख १३ हजार रुपये कराचा भरणा केला. त्यांना १२ लाख १९ हजार रुपये शास्तीमाफी मिळाली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत एकूण एक कोटी २३ लाख १३ हजार ४३१ रुपये जमा झाले.
३२ लाख १० शास्ती माफ
शंभर टक्के शास्तीमाफीमुळे एकूण ३२ लाख १० हजार ४७० रुपये शास्ती माफ झाली. पाणीपट्टीपोटी १६ लाख २५ हजार ३४३ रुपये जमा झाले. लोकअदालतीत थकबाकी प्रकरणांचा निपटारा करून करवसुलीसाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र टेबल लावण्यात आले. वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे, निरीक्षक मुकुंद अग्रवाल, पंकज शर्मा, मनोज चिलंदे, संजय भडागे, सुनील गढरी, अशोक वाघ यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी हे काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.