Archive photo of Powerloom in the city esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: ऑनलाइन नोंदणीबाबत ऊन-सावल्यांचा खेळ! यंत्रमागाच्या वीजदर सवलतीबाबत नवनव्या आदेशाने संभ्रमच; पुरवठ्याचाही सतत व्यत्यय

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरासह जिल्ह्यातील यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज सवलत देण्याचा निर्णय मार्चमध्ये झाला असला तरी त्याच्या ‘ऑनलाइन’ नोंदणीबाबतचा ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. रोज नवनवे आदेश येत असल्याने यंत्रमागधारकांच्या संभ्रमात आणखीच वाढ झाली आहे. वीजदर सवलतीचा लाभ खरेच मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (new order regarding power tariff discount for looms Constant disruption of supply)

यंत्रमाग उद्योगाला सुरवातीपासूनच सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. त्यामध्ये आणखी सवलत देण्याचा निर्णय १२ मार्चला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागास प्रतियुनिट एक रुपया, तर २७ अश्वशक्तीपेक्षा अधिक वापर असणाऱ्या यंत्रमागधारकांना ७५ पैसे सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयाचा फायदा २०२८ पर्यंत मिळणार असल्याने त्याचे स्वागत झाले. मात्र, या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळताना यंत्रमागधारकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते आहे. हा लाभ मिळण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने ‘ऑनलाइन’ नोंदणी सक्ती केली आहे.

संघटनांचा कळीचा प्रश्‍न

यंत्रमागाच्या वीजवापर देयकांवर यंत्रमाग सवलत असा स्वतंत्र शिक्का असल्याने वेगळ्या नोंदणीची गरज काय, असा प्रतिप्रश्न संघटनांकडून उपस्थित करण्यात आला. वस्त्रोद्योग विभागाच्या राज्यातील चारही प्रादेशिक कार्यालयांतील उपायुक्तांनी वीजदर सवलतीसाठी पात्र असणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे पत्र १५ एप्रिलला जारी केले.

पुन्हा ‘ऑनलाइन’ नोंदणीचा मुद्दा आल्याने यंत्रमाधारकांमध्ये नाराजीची लाट उसळली. त्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्यानंतर आधीचे पत्र रद्द करत असल्याचे नवे पत्र जारी करण्यात आले आहे. मात्र, त्यातून ऑनलाइन नोंदणीच्या कचाट्यातून सुटका झालेली नाही.

धुळ्यात घरघर

दुसरीकडे धुळे शहरात पॉवरलूम उद्योगाला घरघर लागली आहे. मालक आणि या व्यवसायावर विसंबून कामगारांवर संकट ओढवले आहे. शहरातील सुमारे पंधरा हजार पॉवरलूमपैकी दीड हजारावर यंत्रमाग भंगारात काढण्याची वेळ चालकांवर आली आहे. परिणामी तसे झाल्यास हजारो मजुरांना बेरोजगार होण्याची धास्ती आहे.

दर्जाअभावी मागणी नसल्याने पॉवरलूममालक मंदीच्या संकटाला सामोरे जात असल्याचे विदारक चित्र आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष चाळीस हजारांवर हातांना रोजगार देणारा शहरातील पॉवरलूम व्यवसाय विविध संकटांशी सामना करीत आहे. या व्यवसायावर अधिकतर मुस्लिमबांधवांचा चरितार्थ अवलंबून आहे. (latest marathi news)

कामगारांची ओढाताण

कापसाचे दर, कापड बाजारात असलेली दोलायमान स्थिती यामुळे पॉवरलूमधारकांसह विशेषतः त्यावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांची मोठी ओढाताण सुरू आहे. अनेक कारणांमुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. या उद्योगाकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही, अशी खंत या व्यवसायाशी निगडित मालकांची आहे.

शहरात देवपूरसह हजारखोली, ऐंशीफुटी रोड, तिरंगा चौक, मौलवीगंज, वडजाई रोड आदी मुस्लिमबहुल भागात अनेक वर्षांपासून पॉवरलूम व्यवसाय सुरू आहे. विविध अडचणी, समस्या असताना हा व्यवसाय टिकून आहे. हजारो कामगारांचा चरितार्थ या व्यवसायावर अवलंबून आहे. तीन-चार वर्षांपूर्वी शहरात दहा हजारांवर पॉवरलूम होते. पैकी जवळपास दोन हजार पॉवरलूममध्ये रंगीत साड्या तयार करण्याचे काम होते. पॉवरलूममुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या आठ ते दहा हजार लोकांना रोजगार प्राप्त होतो.

चढ-उतार कायम...चिंता

कापडासाठी लागणारा कच्चा माल अर्थात कापसाचे दर वाढल्याने अथवा चढ-उतार कायम असल्याने तसेच कापड उद्योगात मंदीचे सावट अद्यापही असल्याने पॉवरलूमला फटका बसत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या व्यवसायासाठी इतर राज्यांतून धुळ्यात येणारे सूत महागडे आहे.

या दरावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याची तक्रार पॉवरलूम व्यावसायिकांची आहे. एकदा सूत खरेदीनंतर कापड विक्री करेपर्यंतच्या कालावधीत दर बदलत राहिल्याने कापडाची विक्री नेमक्या किती दराला करायची, याचा अंदाजही पॉवरलूम व्यावसायिकांना येत नाही. कापड उत्पादन खर्चाच्या तुलनेत पॉवरलूम व्यावसायिकांना विक्रीतून अपेक्षित लाभ होत नाही.

त्यामुळे या व्यवसायाला फटका बसतो आहे. त्यातच आता ‘ऑनलाइन’ नोंदणीबाबतचा ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असल्याने पॉवरलूम व्यावसायिक आणखी संकटात सापडत आहे. दरम्यान, शहरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा या व्यवसायात व्यत्यय येत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solar Storm: गंभीर इशारा! अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ, पृथ्वीवर धडकण्याची शक्यता; भारतावर किती होईल परिणाम?

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

SCROLL FOR NEXT