MSEDCL esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अक्कलपाडा पाणी योजनेसाठी ‘एक्स्प्रेस फिडर’; महावितरणकडून विशेष बाब म्हणून मान्यता

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेवरील पाणीपुरवठा केंद्रासाठी एक्स्प्रेस फिडर जोडणीस विशेष बाब म्हणून महावितरणने मंजुरी दिली आहे. यामुळे या योजनेला आणखी गती मिळणार आहे.

धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत १६९ कोटी रुपये खर्चातून अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा महापालिकेकडून होत आहे. योजनेंतर्गत पंपिंग मशिनरी, वीज जोडणी या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबींचे कामही अंतिम टप्प्यात सुरू आहे.

दरम्यान, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेस वीज जोडणी देण्याबाबत स्थानिक स्तरावर अनेक अडचणी होत्या. यात अक्कलपाडा येथे वीज वाहिनी टाकणे अशक्य असल्याने ३३ के. व्ही. वरून विशेष बाब म्हणून वीजजोडणीची मागणी करण्यात आली. त्यावेळी विद्युत वितरण कंपनीमार्फत ३३ के. व्ही. वरून एलटी कनेक्शन घेणे अशक्य आहे. तथापि, यासाठी विशेष बाब म्हणून महावितरणचे महासंचालक (संचलन) (मध्यवर्ती मुख्य कार्यालय, प्रकाशगड बांद्रा, मुंबई) यांच्याकडे मागणी करण्याबाबत पर्याय पुढे आला.

त्यानुसार कार्यवाही करून मागणी करण्यात आली. सदरच्या कामामुळे प्रकल्पास होत असलेला विलंब व प्रकल्पाची शहरासाठी असणारी गरज व उपयुक्तता खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी संबंधित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मनपा प्रशासनातर्फे आयुक्त देवीदास टेकाळे, उपायुक्त विजय सनेर यांनीही यासाठी सहकार्य केले. या पाठपुराव्यानंतर अखेर महावितरणने एक्स्प्रेस फिडर जोडणीस विशेष बाब म्हणून मान्यता दिली.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कामास मान्यता मिळाल्याबद्दल महापौर श्री. कर्पे, उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती शीतल नवले, सभागृह नेते राजेश पवार, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, महिला बालकल्याण सभापती योगिता बागूल, उपसभापती आरती पवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, अभियंता कैलास शिंदे, विद्युत अभियंता एन. के. बागूल यांनी महानगरपालिकेतर्फे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT