Home Guard Recruitment esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Home Guard Recruitment : जिल्ह्यात नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीस सुरुवात; जिल्हा समादेशक किशोर काळे

Home Guard Recruitment : १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Home Guard Recruitment : जिल्हा होमगार्डतर्फे धुळे, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा व साक्री या पथकातील पुरुष व महिलांचा (शिंदखेडा येथील महिला वगळून) अनुशेष भरून काढण्यासाठी नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी आजपासून (ता. २५) ते १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली. (home guard member registration has started in district from today )

श्री. काळे यांनी सांगितले, की धुळे पोलिस पथकाअंतर्गत धुळे शहर, धुळे तालुका, आझादनगर, चाळीसगाव रोड, देवपूर, पश्चिम देवपूर, मोहाडी व सोनगीर, तर शिरपूर पथकातंर्गत शिरपूर, शिरपूर तालुका, साक्री पथकाअंतर्गत पोलिस ठाणे, साक्री व निजामपूर, तर शिंदखेडा पथकाअंतर्गत पोलिस ठाणे शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा पथकातील दोंडाईचा पोलिस ठाणेअंतर्गत रहिवासी असलेल्या पुरुष व महिलांसाठी (शिंदखेडा महिला वगळून) https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर सदस्य नोंदणी करता येणार आहे.

होमगार्ड पात्रता निकष

उमेदवार हा वरील पथकातील पोलिस ठाणेअंतर्गत रहिवासी असावा. पुरावा म्हणून मतदान कार्ड किंवा आधारकार्ड असावे, शिक्षण किमान दहावी पास, शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रक असावे. वय २० ते ५० वर्षे असावे. जन्म दिनांक पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा एसएससी बोर्ड प्रमाणपत्र, पुरुषासाठी उंची १६२ सेमी, छाती न फुगविता ७६ सेमी, किमान ५ सेमी फुगवणे आवश्यक, महिलांसाठी उंची १५० सेमी, उमेदवारास विहित केलेल्या वेळेत धावणे, गोळाफेक या शारीरिक चाचण्या द्याव्या लागतील.

गुणवत्तेवर निवड

उमेदवार इतर कार्यालयात वेतनी सेवेत किंवा खासगी सेवेत काम करत असल्यास कार्यालय प्रमुख किंवा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील. माजी सैनिक, एनसीसीचे बी व सी प्रमाणपत्र, आयटीआय, जिल्हास्तरीय क्रीडेमध्ये प्रावीण्य प्राप्त, जडवाहन चालक परवानाधारक व इतर अन्य तपशिलाच्या पुष्ट्यर्थ सर्व संबंधित मूळ प्रमाणपत्र व नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो नोंदणीवेळी सादर करणे बंधनकारक असेल. उमेदवारास नोंदणीच्या ठिकाणी स्वखर्चाने यावे लागेल. तसेच नोंदणीवेळी किंवा प्रवासात काही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. उमेदवाराची निवड ही पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल.

शारीरिक क्षमता चाचणी

अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्रे व शारीरिक क्षमता चाचणी १७ ऑगस्टला (शनिवारी) सकाळी सहा ते अकरा या वेळेत जिल्हा पोलिस कवायत मैदानावर नोंदणी प्रक्रियेसह होईल. निर्धारित संकेतस्थळावर इंग्रजीतून २५ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावा. यात काही अडचण असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय, धुळे, दूरध्वनी ०२५६२- २९९८५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री. काळे यांनी कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT