Dhule News : मतदाराने मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करणे, तसेच मतदारयादीमधील नाव, पत्ता, जन्मतारीख आदी दुरुस्तीसाठी अर्ज नंबर सहा आणि आठ भरून दिल्यावर, तसेच अर्ज स्वीकृतीनंतर संबंधित मतदाराचे मतदार ओळखपत्र पोस्ट ऑफिसमार्फतच मोफत घरपोच वितरित करण्यात येते. इतर कोणत्याही प्रकारे मतदार ओळखपत्रांचे वाटप होत नसल्याने मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. (Dhule News Distribution of Voter ID Card by Post Office)
जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले, की केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पाचव्या टप्प्यात होणार असून, २० मेस मतदान होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार ओळखपत्र (ईपीक) हा मतदाराची ओळख पटविण्याचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
मतदाराने मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करणे, तसेच मतदारयादीमधील नाव, पत्ता, जन्मतारीख आदी दुरुस्तीसाठी अर्ज क्रमांक ६ व ८ भरून दिल्यावर, तसेच अर्ज स्वीकृतीनंतर संबंधित मतदाराचे मतदार ओळखपत्र टपाल कार्यालयामार्फत मोफत घरपोच पाठविण्यात येते. (latest marathi news)
काही कारणास्तव मतदारास मतदार ओळखपत्र (ईपीक) प्राप्त न झाल्यास त्याने संबंधित पोस्ट ऑफिस व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कार्यालयास संपर्क साधणे आवश्यक आहे. मतदार ओळखपत्र फक्त पोस्ट ऑफिस, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदारांच्या कार्यालयामार्फत मतदारांना वितरित करण्यात येते.
इतर कोणत्याही प्रकारे मतदार ओळखपत्राचे (ईपीक) वाटप होत नसल्याने मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.