Dignitaries present at the inauguration of Balsnehi Police Station in Azad Nagar Police Station. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बालस्नेही पोलिस ठाण्याचे उद्‌घाटन; जिल्ह्यात पहिले

Dhule : शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यात जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही पोलिस ठाण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यात जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही पोलिस ठाण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील पहिले बालस्नेही पोलिस ठाणे तयार करण्यात आले.

त्यासाठी आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ परवानगी दिली. त्यामुळे बालस्नेही पोलिस ठाणे ही संकल्पना साकार करणे शक्य झाले. या उपक्रमाचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंखे, बालकल्याण समिती सदस्या अनिता भांबेरे, सुरेखा पवार, जिल्हा परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव, परिवीक्षा अधिकारी पी. एस. कोकणी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण.

संरक्षण अधिकारी तृप्ती पाटील, राज्य समन्वयक नंदू जाधव, जिल्हा समन्वयक श्रीकांत मोरे, सखी वन स्टॉप सेंटरच्या गायत्री भामरे, चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक प्रतीक्षा मगर आदी उपस्थित होते.

आझादनगर पोलिस ठाण्यातील बालस्नेही पोलिस ठाण्याच्या आवारात येताना बालकांना सुरक्षित व मनोरंजक वातावरण असावे यादृष्टीने जन साहस संस्थेच्या इंदूर, धुळे शाखेने भिंती बालस्नेही चित्रांनी रंगवून दिल्या.

यात बालकांचे सर्वोत्तम हित जोपासल जावे, बालकांची सहभागिता अंगीकारली जावी, बालकांप्रति संवेदनशील व्यवस्था निर्माण केली जावी, त्यांना भयमुक्तीचे वातावरण असावे, बालस्नेही प्रक्रिया बाल न्यायव्यवस्थेमध्ये रुजविणे आदी प्रयत्न असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT