Dhule News : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासह धुळे जिल्ह्यात चांगला पाऊस पडो, शेतकऱ्यांना खूप उत्पन्न येवो आणि ते चांगल्या दराने विक्री होवो, अशी प्रार्थना शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी गुरुवारी (ता. ६) शिंदखेडा मतदारसंघाचे कुलदैवत असलेल्या श्री पेडकाईमाता आणि श्री आशापुरी मातेच्या चरणी केली. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Dhule News From MLA Rawal Pedkai Ashapuri prayer)
साळवे (ता. शिंदखेडा) येथील श्री पेडकाई मंदिरात आमदार रावल यांनी विधिवत पूजा व आरती केली. तसेच पाटण (ता. शिंदखेडा) येथील आशापुरी मातेच्या मंदिरात कार्यकर्त्यांसमवेत महाआरती करून पावसासाठी साकडे घातले.
मतांचे तुष्टीकरण
आमदार रावल म्हणाले, की धुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला. पाच विधानसभा मतदारसंघांत भाजपला मताधिक्य आहे; परंतु एकट्या मालेगाव शहराने पाचही मतदारसंघांचे मताधिक्य कमी करत भाजपचा विजय हिरावून घेतला. त्यामुळे मतदान न करणे हे किती महागात पडते हे या निकालावरून दिसून आले.
दिल्लीतून निधी आणण्यासाठी आपला खासदार असणे महत्त्वाचे असते. दिल्लीत आपले भाजपचे सरकार असले तरी त्या ठिकाणी पाठपुरावा करून तो निधी आणण्यात डॉ. सुभाष भामरे मेहनत घेत होते. मतदारसंघातील रेल्वेचा प्रश्न त्यांनी पाठपुराव्यातून सोडविला. केवळ मतांचे तुष्टीकरण करण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी ठरला. (latest marathi news)
पाऊस नसल्याने अडचण
शिंदखेडा मतदारसंघात सुलवाडे-जामफळ सिंचन योजना, बुराई बारमाही, नदी आणि नाल्यांवर साठवण बंधारे, दहा हजार शेतकऱ्यांना सिंचन विहिरीवाटप, अशी कामे केली; परंतु गेल्या वर्षी पाऊस न पडल्याने मतदारसंघ अडचणीतून दिवस काढत आहे. त्यामुळे आशापुरी माता आणि पेडकाई मातेला चांगला हंगाम यावा, चांगला पाऊस पडावा यासाठी साकडे घातले, असे आमदार रावल यांनी सांगितले.
बाजार समिती सभापती नारायण पाटील, कामराज निकम, पंकज कदम, माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, माजी सभापती संजीवनी शिसोदे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र देसले, भाजपचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष दीपक बागल, जिल्हा परिषद सदस्य भूपेंद्र गिरासे, डी. आर. पाटील, माजी सदस्य वीरेंद्र गिरासे, प्रा. डी. एस. गिरासे, पंचायत समिती सभापती रणजितसिंह गिरासे, नथ्थू वारुळे, उपसभापती दीपक मोरे, बाजार समितीचे संचालक किशोर रंगराव पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.