Labor-Employee Joint Action Committee march against government policies on Thursday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सरकारी धोरणांविरुद्ध कामगार एकवटले; धुळ्यात मोर्चातून निषेध

Dhule : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात कामगार-कर्मचारी संयुक्त कृती समितीने शुक्रवारी (ता.१६) देशव्यापी संप पुकारला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात कामगार-कर्मचारी संयुक्त कृती समितीने शुक्रवारी (ता.१६) देशव्यापी संप पुकारला. त्यास जिल्ह्यातून सक्रिय पाठिंबा देण्यात आला. शहरातील श्री संतोषीमाता चौकातून मोर्चा काढत आंदोलकांकडून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करीत एकवटलेल्या कामगारांनी लक्ष वेधले. (Labor Employees Joint Action Committee called nationwide strike against policies of Central and State Governments)

कामगार कल्याण भवन येथे कामगार-कर्मचारी संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व कामगार, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य एकवटले. तेथून मोर्चा निघाला. शहीद स्मारक, जुने सिव्हिल हॉस्पिटलमार्गे क्युमाईन क्लब येथे मोर्चाची सांगता झाली. नंतर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

एल. आर. राव, दीपक सोनवणे, पोपटराव चौधरी, हिरालाल सापे, वसंतराव पाटील, अशोक चौधरी, सुधीर पोतदार, योगेश माळी, इरफान मणियार, शकील नबी, सुरेश मोरे, कैलास सोनवणे, रोहिदास पवार व विविध क्षेत्रातील संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्र सरकारवर टीका

बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. खर्च वाढल्याने व सरकारी शाळा बंद केल्या जात असल्याने सामान्य व गरीब जनतेला शिक्षण घेणे अशक्य होत आहे. सरकारी धोरणांमुळे बेरोजगार युवकांच्या आत्महत्या घडत आहेत.

महिला सुरक्षा, आरोग्य व सुरक्षेचे प्रश्‍न गंभीर आहेत. केंद्र सरकारच्या कामगार-कर्मचारी विरोधी धोरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या असंतोषास केंद्रातील भाजपप्रणित सरकार बगल देत कामगार व शेतकरी यांचा जाती-धर्माच्या मुद्द्यात विभागणी करून सामान्य जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा निषेध असल्याचे आंदोलकांनी म्हटले.

अशा आहेत मागण्या

शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना उत्पादन खर्चाचा दीडपट भावाची कायदेशीर हमी द्यावी. लहान व मध्यम शेतकरी कुटुंबांना कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती द्यावी. कामगारांना दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन द्यावे. सार्वजनिक उद्योगांचे शिक्षण आणि आरोग्याचे खासगीकरण थांबवावे.

सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणे बंद करावे. सर्व रिक्त पदे भरावी. मनरेगामध्ये दरवर्षी दोनशे दिवस काम आणि रोज सहाशे रुपये मजुरी देऊन ही योजना बळकट करावी. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करावी. ईपीएस ९५ अंतर्गत संघटित- असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान नऊ हजार रुपये व महागाई भत्ता लागू करावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार! उद्धव ठाकरेंची कोल्हापूरात घोषणा, महायुतीवर हल्लाबोल

सुशांत सिंग राजपूतची हत्याच! सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा धक्कादायक दावा; म्हणाली- एम्सच्या डॉक्टरने रिपोर्ट...

IPS Sanjay Verma : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana : तुम्ही बळ दिलं तर... लाडक्या बहीणींना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन; डिंसेंबरच्या हप्त्याबद्दलही सांगितलं

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

SCROLL FOR NEXT