Dhule Municipality News : सुधारित कर आकारणीने आधीच कंबरडे मोडलेल्या धुळेकरांवर नव्याने करवाढीचा कोणताही बोजा न टाकणारे एकूण ७२५ कोटींच्या खर्चाचे २०२४-२०२५ चे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने गुरुवारी (ता. १५) स्थायी समितीला सादर केले.
सर्व समाजघटकांचा विचार करीत वस्तुनिष्ठ व काटेकोर आर्थिक नियोजनाचा प्रयत्न अंदाजपत्रकातून केल्याचे प्रशासनाने सांगितले. (Dhule municipal administration submitted budget to standing committee)
दरम्यान, या अंदाजपत्रकानुसार प्राप्त उत्पन्नातून कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुमारे ७० कोटी, पाणीपुरवठ्यावर ३० कोटी, आरोग्य व सुखसोयींवर २६ कोटी, तर शिक्षणावर १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेतील प्रशासकराज असलेल्या कार्यकाळात २०२३-२०२४ चे सुधारित व २०२४-२०२५ चे मूळ अंदाजपत्रक मुख्य लेखाधिकारी गजानन पाटील यांनी आयुक्तांतर्फे स्थायी समितीला सादर केले.
आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्य लेखाधिकारी पाटील यांनी अंदाजपत्रकाची मूळ प्रत प्रशासक दगडे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
नंतर त्यांनी सभागृहात अंदाजपत्रकाचे विवेचन केले. अंदाजपत्रक सादर करताना सर्व घटकांचा विचार करून सर्वसमावेशक अंदाजपत्रक तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुनिष्ठ व काटेकोर आर्थिक नियोजनाचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे श्री. पाटील म्हणाले.
अंदाजपत्रक असे
सुरवातीच्या २०२३-२०२४ मधील शिलकीसह महसुली तथा भांडवली जमा ६७५.३३ कोटी असून, त्यामधून महसुली तथा भांडवली खर्च ५७८.४१ कोटी अपेक्षित आहे. तसेच शासन निधी ९६.८६ कोटी व मनपाचा सहा लाखांचा निधी शिलकीचा, तर २०२४-२०२५ च्या मूळ अंदाजपत्रकात सुरवातीच्या शिलकीसह महसुली तथा भांडवली जमा ७२५.३६ कोटी असून, महसुली तथा भांडवली खर्च ७२३.३८ कोटी अपेक्षित आहे. यानुसार शासन अनुदानाचे १.९३ कोटी व मनपा निधी पाच लाख शिलकीचे मूळ अंदाजपत्रक सादर झाले.
प्रशासकांतर्फे सूचना
प्रशासनाकडून सादर अंदाजपत्रक मंगळवारी (ता. २०) स्थायी समितीत चर्चा व मंजुरीसाठी येईल. स्थायीपुढे अंदाजपत्रक येण्यापूर्वी ज्या विभागांकडून अजून यात काही समाविष्ट करायचे राहून गेले असे वाटते त्यांनी येत्या चार दिवसांत संबंधित तरतुदी अंदाजपत्रकात करून घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना प्रशासक दगडे-पाटील यांनी विभागप्रमुखांना दिली.
शासनाच्या मोठ्या योजना शहरात येत आहेत. यात अमृत-२, नगरोत्थान योजना, केंद्र सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलमेंटच्या योजना, ट्रक टर्निनस, ई-बस आदी विविध योजना व कामांचा यात समावेश आहे. त्यादृष्टीने काटेकोर आढावा घेऊन तरतुदी करा.
पाचकंदील मार्केट, देवपूर मार्केटचाही अंतर्भाव करण्याचे त्यांनी सूचित केले. येत्या काळात मनपा शाळांची अवस्था सुधारणे, महापालिका आयुर्वेद दवाखान्यातील पंचकर्म सेंटर चांगल्या पद्धतीने सुरू करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला.
दायित्वाचा प्रश्न
ठेकेदारांची बिले, मनपा कर्मचाऱ्यांची देणी, निवृत्त कर्मचारी, निवृत्त मनपा शिक्षकांची देणी, सातव्या वेतन आयोगाचा फरक असे मोठे दायित्व महापालिकेकडे आहे, त्यादृष्टीनेही नियोजन करण्याचे व त्यासाठी शंभर टक्के कर वसुलीसाठी प्रयत्न करावेत, मनपाच्या शाश्वत विकासाला हातभार लागेल यादृष्टीने अंदाजपत्रकात तरतुदी होतील याकडे लक्ष देण्याची सूचनाही प्रशासकांनी केली.
-२०२२-२३...५८६.९९ कोटी
-२०२३-२४...८६०.३२ कोटी
-२०२४-२५...७२५.३६ कोटी (बोल्ड करावे)
जमेची बाजू
-आरंभीची शिल्लक...९६ कोटी ९१ लाख ८० हजार-मनपा दर व कर...२६४ कोटी ४४ लाख ४१ हजार
-विशेष अधिनियमान्वये...१९ कोटी ०३ लाख ५८ हजार
-मालमत्ता व सेवांपासून...९ कोटी ६८ लाख ८९ हजार-अनुदाने...११ कोटी ६२ लाख ४५ हजार
-संकीर्ण...५ कोटी ३५ लाख ७६ हजार-पाणीपुरवठा अंदाजपत्रक...३६ कोटी ०३ लाख ६२ हजार-भांडवली जमा...२८१ कोटी ६५ लाख ४० हजार
-असाधारण जमा...६० लाख
-एकूण...७२५ कोटी ३५ लाख ९१ हजार
खर्चाची बाजू
-कर्मचारी पगार...६७ कोटी ३३ लाख ५१ हजार
-सामान्य प्रशासन...७२ कोटी ८३ लाख ५७ हजार
-सार्वजनिक सुरक्षितता...२० कोटी ३३ लाख
-आरोग्य, सुखसोयी...२६ कोटी १६ लाख १० हजार
-शिक्षण...१५ कोटी २७ लाख
-अंशदाने...७१ लाख
-संकीर्ण...३८ कोटी ३५ लाख ४४ हजार
-राखीव तरतुदी...१ कोटी ८७ लाख ९९ हजार
-पाणीपुरवठा पगार...४ कोटी २० लाख ५४ हजार-पाणीपुरवठा अंदाजपत्रक (क)...३० कोटी २८ लाख
ं-भांडवली खर्च अंदाजपत्रक (अ व क)...४४५ कोटी ४२ लाख १७ हजार
-अनामत व अग्रिम...६० लाख
-अखेरची शिल्लक...१ कोटी ९७ लाख ५९ हजार-एकूण...७२५ कोटी ३५ लाख ९१ हजार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.