Thousands of activists of Truth Seeking Farmers and Shramik Farmers Association participated in Rasta Roko movement on national highway. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सत्यशोधक, श्रमिक शेतकरी संघटनेकडून ‘चक्काजाम’

Dhule : सत्यशोधक शेतकरी संघटना व श्रमिक शेतकरी संघटनेने शेवाळी फाट्यावर(ता.साक्री) राष्ट्रीय महामार्गावर दोन तास चक्काजाम करत वाहतूक बंद केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना संयुक्त कृती समितीने शुक्रवारी (ता.१६) देशभर, ग्रामीण भारत बंदचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे सत्यशोधक शेतकरी संघटना व श्रमिक शेतकरी संघटनेने शेवाळी फाट्यावर(ता.साक्री) राष्ट्रीय महामार्गावर दोन तास चक्काजाम करत वाहतूक बंद केली. सुमारे हजाराच्या जवळपास मोर्चेकरी यावेळी रस्त्यावर होते यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (dhule Satyashodhak Farmers Association and Shramik Farmers Association blocked traffic on national highway)

मोर्चामध्ये शेती उत्पादित सर्व शेतीमालाला उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा (सीटी अधिक ५० टक्के) असा भाव मिळावा. स्वामिनाथन समितीच्या सर्व शिफारशी लागू करा. लहान-मध्यम शेतकरी कुटुंबांची सरसकट कर्ज माफ करावीत, कामगारांना २६ हजार रुपये किमान वेतन द्यावे.

चार श्रमसंहिता कामगार विरोधी आहेत त्या रद्द करा. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवा. शिक्षण आरोग्य यांचे खाजगीकरण करू नका. मनरेगामध्ये दोनशे दिवस काम व सहाशे रुपये दररोज वेतन द्या. वन हक्क कायदा २००६ प्रमाणे ज्या दावेदारांनी दावे दाखल केलेले आहेत, त्यांना सातबारा उतारा द्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिऱ्हाड मोर्चाला दिलेल्या आश्वासनांची तत्काळ पूर्तता करा. प्रलंबित दाव्यांची स्थळ पाहणी व जीपीएस मोजणी करून दावे ताबडतोब पात्र करा. दिल्ली सरहद्दीवर अडीच वर्षांपूर्वी सातशेपेक्षा जास्त शहिदांच्या नातेवाइकांना भरपाई द्या.

साठ वर्षांपेक्षा वृद्ध शेतकरी शेतमजुरांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्या. शेतीबाबत दुष्परिणाम करणारी आयात-निर्यात धोरणे ताबडतोब थांबवा, आदी मागण्यांचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना साक्री तहसीलदारांमार्फत देण्यात आले.

नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी रस्त्यावर येऊन निवेदन स्वीकारले. निवेदनावर सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले, मन्साराम पवार, अश्पाक कुरेशी, यशवंत माळचे, मेरुलाल पवार, पवित्राबाई सोनवणे, लालाबाई भोये, दिलीप ठाकरे, उत्तम महिरे, रामलाल गवळी, रमण माळवी, राकेश भोसले, कुमाऱ्या सोनवणे, निंबाबाई ब्राह्मणे, जीवन गावित, काळू अहिरे, दिलीप गावित आदींसह पन्नास कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT