Panakhed is an ongoing class with the presence of only four students. Vice Chairman Vijay Bagul checking the academic quality of the students in the second photo. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिरपूरला जिल्हा परिषदेच्या शाळांचे तीन तेरा

Dhule : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनागोंदी सुरू असल्याचे शुक्रवारी (ता. १६) सभापती, उपसभापतींनी दिलेल्या भेटींदरम्यान उघड झाले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनागोंदी सुरू असल्याचे शुक्रवारी (ता. १६) सभापती, उपसभापतींनी दिलेल्या भेटींदरम्यान उघड झाले. रजा संपूनही मुख्याध्यापक गायब, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकाऱ्यांनी अनेक महिन्यांपासून शाळांना भेटच दिलेली नाही. पोषण आहार घेतल्यानंतर बेपत्ता होणारे विद्यार्थी, अक्षरओळखही नसलेले विद्यार्थी असे गंभीर प्रकार आढळले. आंबे येथे शिक्षण परिषद असूनही एकही शिक्षक उपस्थित नसल्याचे दिसून आले. (Dhule Shirpur Zilla Parishad schools in bad condition)

पंचायत समितीच्या सभापती लताबाई पावरा, उपसभापती विजय बागूल, माजी सभापती वसंत पावरा, पंचायत समिती सदस्य राहुल पावरा, विजय खैरनार यांनी धारबर्डी, जुनी सांगवी, पनाखेड, पळासनेर, हेंद्र्या‍पाडा, चारणपाडा आदी गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांना शुक्रवारी अनपेक्षित भेट दिली. पंचायत समितीच्या मासिक बैठकीत आदिवासीबहुल भागातील जिल्हा परिषद शाळांविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्याने या भेटीचे नियोजन करण्यात आले.

तिन्ही घटक बेपत्ता

धारबर्डी शाळेतील शिक्षक आनंदा रघुनाथ गायकवाड यांची अर्जित रजा संपल्यावरही ते शाळेत हजर झालेले नव्हते. तेथील पटसंख्येच्या निम्मे विद्यार्थीदेखील उपस्थित नव्हते. सहा महिन्यांपासून विस्तार अधिकाऱ्यांनी तेथे भेट दिली नसल्याचे दिसून आले.

गावातील अंगणवाडीही सकाळी पावणेअकरालाच बंद झाली होती. जुनी सांगवी शाळेचे मुख्याध्यापक बँकेत गेल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांची मस्टरवर सही नव्हती. विद्यार्थिसंख्यादेखील अत्यल्प असल्याचे आढळले.

शिक्षक गप्पांत रंगले

पनाखेड येथे मुख्याध्यापक अर्जित रजा टाकून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याबाबत अधिकाऱ्यांना कोणतीच माहिती नव्हती. शिक्षक गप्पा मारत होते, तर विद्यार्थी व्हरांड्यात फिरत असल्याचे दिसून आले.

काही वर्गांत केवळ तीन ते चार विद्यार्थी हजर होते. तेथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर खूप खालावल्याचे निरीक्षण पदाधिकाऱ्यांनी तपासणीत नोंदविले. चार महिन्यांपासून तेथे विस्ताराधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे आढळले.

रजेचे अर्ज बॅगेत

पळासनेर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक गैरहजर असून, दोन शिक्षकांच्या अर्जित रजेचे अर्ज त्यांच्या बॅगमध्येच असल्याचे सांगण्यात आले. हालचाल रजिस्टरवर त्याची कोणतीच नोंद नव्हती. चारणपाडा शाळेत तीनपैकी एकच शिक्षक हजर होते. शाळेत घाणीचे साम्राज्य दिसून आले. हजेरी पटसंख्येच्या निम्मे होती. येथेही दीर्घकाळ विस्ताराधिकाऱ्यांनी भेट न दिल्याचे दिसून आले.

परिषदेतून शिक्षक बेपत्ता

आंबे केंद्रात शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते. तिचा वेळ दुपारी बारा ते तीन असा होता. प्रत्यक्षात पदाधिकारी पोचले तेव्हा दुपारी सव्वादोनला शुकशुकाट होता. केंद्रप्रमुखांशी संपर्क केल्यावर ते पोचले. त्यांनी दुपारी दोनलाच परिषद आटोपून घेत असल्याचे सांगितले.

"मासिक सभेत सदस्यांकडून तक्रारी झाल्याने जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या. अधिकाऱ्यांनी शाळांना वेळोवेळी भेट देऊन नियंत्रण राखणे अपेक्षित आहे. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करीत आहोत." -विजय बागूल, उपसभापती, पंचायत समिती, शिरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT