Akshaya Tritiya  esakal
उत्तर महाराष्ट्र

Akshaya Tritiya 2024 : ना सालदारकी, ना घरगडी; आता फक्त रोजंदारी! आखाजीला सालदारकी ठरणे बंदच

Akshaya Tritiya : खानदेशात आखाजी ते आखाजी असे सालदारकीचे साल फुटायचे. याकडे साऱ्‍यांचेच लक्ष लागून राहायचे.

जगन्नाथ पाटील -सकाळ वृत्तसेवा

Akshaya Tritiya 2024 : खानदेशात आखाजी ते आखाजी असे सालदारकीचे साल फुटायचे. याकडे साऱ्‍यांचेच लक्ष लागून राहायचे. आता गेल्या तीन-चार वर्षांपासून सालदारकी करायला कुणीही तयार नाही. सालदारकीपेक्षा रोजंदारी परवडते अन् माणूस मोकळाही राहतो. वर्षभर अडकून राहत नाही. मालकाकडे सतत अडकून न राहता सालदारकी वा घरगडीपेक्षा रोजंदारी बरी. नको ते सालदारकीचे पॅकेज, असे म्हणत सालदारकी केवळ नावालाच राहिली आहे. ( No one is ready to serve as president for three to four years on akshaya tritiya )

हवी मोकळीक

खानदेशात शेतीशिवारातील सारीच कामे सालदाराकडून आवरली जात होती. मोठ्या शेतमालकाकडे त्याचा पूर्णवेळ जात होता. त्याला वेळेचे बंधन नव्हते. राबराब राबण्याचे माहिती होते. पूर्वी रोजंदारी मिळण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत होते. मग, हमखास वर्षभर काम मिळविण्यासाठी सालदारकी पत्करली जायची. पैशांसह एक, दोन पोते धान्यही मिळायचे. त्यातून कुटुंबाचा गाडा चालायचा. मात्र, रोजंदारी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यापासून सालदारकी करायला कुणीही तयार नाही. पाच-सहा तास काम करून प्रत्येकालाच मोकळीक हवी आहे.

लाखापेक्षा अधिक पॅकेज तरीही ना?

पूर्वी दोन-चारशे रूपयांपासून सुरु झालेली वार्षिक सालदारकी. आता लाखावर येवून ठेपली आहे. तेवढी रक्कम कोणतेही काम केल्यानंतर सहज मिळते. लाखाचे पॅकेज लाखमोलाचे असले तरी नकोच. असे म्हणत सालदारकी नाकारण्याचे प्रमाण वाढले अन् सालदारकीला ना म्हणत खो दिला गेला.(latest marathi news)

रोजंदारी परवडणारीच

प्रत्येक गावात गडी माणसाला किमान तीनशेच्या रोजंदारीने काम उपलब्ध असते. त्यातून तो वर्षभरात लाखापेक्षा अधिकची कमाई करून घेतो. त्याला इतर विविध कामांसाठीही वेळ मिळतो. सालदारकी करतांना हे कधीच जमत नव्हते. म्हणून रोजंदारी परवडतेच असे म्हणत सालदारकीसाठी आता कुणीही पुढे येत नाही.

सातपुड्यातील मजुरांना हवा अॅडव्हान्स

प्रत्येक गावात सालदारच काय, हमीचा रोजंदारी मजूर मिळणेही दुर्लभ झाले आहे. सातपुड्यातून दाखल झालेल्या आदिवासी मजूरांकडून अधिक उरकली जात आहेत. ते रोजंदारीने कामे करतात. पण, त्यांना महिनाभराचे अॅडव्हॉन्स रोजंदारी द्यावी लागत असते.

''आजोबांसह वडिलांनीही सालदारकी केली. आता तेवढे रात्रंदिवस काम करणे शक्य होत नाही. त्यापेक्षा रोजंदारी करणे परवडते.''- गुलाब पाटील, शेतमजूर, कापडणे

''सालदारकी हे खुपच कष्टाचे काम. मालकाकडेच अधिक राबणे येते. रात्रीबेरात्री शेतावर पळावे लागते. त्यात सालदाराची पिळवणूकही व्हायची. अशा स्थितीत रोजंदारी करून मोकळे राहता येते.''- आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT