Female devotees performing Aarti near Goddess Dhandai Devi. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dussehra 2024 : विजयादशमीनिमित्त धनदाईदेवी मंदिरात मांदियाळी; नवीन दुचाकी, चारचाकी वाहन भेटविण्यासाठी वाहनधारकांची गर्दी

Dussehra : धनदाईमातेच्या जयजयकाराने आज पहाटेपासून आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवी मंदिर परिसर गजबजला होता.

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : धनदाईमातेच्या जयजयकाराने आज पहाटेपासून आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवी मंदिर परिसर गजबजला होता. आज सकाळपासून नवीन दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची गर्दी झाली होती. सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत ५० हजार भाविकांनी दर्शन घेतले. गेल्या आठ दिवसांपासून सुमारे सात लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. चक्रपूजा, आरत्या लावणे, नवसपूर्ती व दर्शनासाठी राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशातील भाविकांनी हजेरी लावली. (On occasion of Vijayadashami motorists two wheelers and four wheeler at dhandai temple )

दिवसभर मंदिराजवळ भाविकांची मांदियाळी होती. येथील आदिमाया धनदाईदेवीस राज्यभरातील सुमारे ७७ पेक्षा अधिक कुंळाचे भाविक कुलदैवत मानतात. घटस्थापनेपासून आदिमायेचे मंदिर भाविकांची श्रद्धा, भक्तिमय वातावरणात फुलून गेले. आठवडाभरापासून मंदिराजवळ धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. मंदिरात धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळासह बाहेरगावच्या भाविकांनीही घटस्थापना केली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सुमारे सात लाख भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वाधिक गर्दी झाल्याची माहिती धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, खजिनदार उत्तमराव देवरे, सचिव महेंद्र देवरे व संचालक मंडळाने दिली. सकाळपासून भाविकांनी रांगेत दर्शन घेत नवसपूर्तीचे कार्यक्रम केले. तरुण ऐक्य मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवेकरी, पोलिस कर्मचारी गर्दीवर लक्ष ठेवून आहेत. (latest marathi news)

शिवाय येथील दिवंगत अण्णासाहेब आर. डी. देवरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दिवसभर सहकार्य केले. तसेच आठ दिवस गावातील पुरोहितांनी सहकार्य केले. भाविकांच्या सेवेसाठी चोवीस तास पाणी व अन्य सुविधा तरुण ऐक्य मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. मंदिरालगत सावलीसाठी मंडप टाकण्यात आला आहे. मंदिरालगत भाविकांना चक्रपूजेसाठी मंडप टाकण्यात आला आहे.

मंदिरात चैतन्य

नवरात्रोत्सवात आदिमाया धनदाईदेवीजवळ पहिल्या माळेपासून भाविकांची गर्दी होती. पहिल्या माळेपासून देवीजवळ चैतन्य निर्माण झाले आहे. धनदाईदेवीजवळ मोफत निवासासह मुबलक पाणी, सावलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी (ता. १२) नवमी व विजयादशमी (दसरा) मोठी गर्दी होती. दसऱ्याच्या दिवशी नवीन वाहन खरेदी करणारे भाविक देवीजवळ वाहन भेटविण्यासाठी आणतात.

देवीजवळ आरत्या

देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. माघ अष्टमी, चैत्र अष्टमी व नवरात्रोत्सवाच्या अष्टमीला देवीजवळ महिला भाविक अकरा, एकवीस, एकावन्न पुरणाचे वा कनकेचे दिवे लावतात. आज पहाटेपासून महिला भाविकांची दिवे लावण्यासाठी लगबग सुरू होती. देवीला आहेर चढवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नवसपूर्ती केली. कुलदैवत मानणारे भाविक नवरात्रोत्सव, चैत्र व माघ अष्टमीला सर्वाधिक महत्त्व देतात. देवीजवळ पाचवी, सातवी, अष्टमीच्या दिवशी भाविक चक्रपूजा, आहेर, साजशृंगार चढविणे, आरत्या लावण्यास प्राधान्य देतात. आज खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT