NCP District President Sumeet Pawar giving the statement of demand to Minister Anil Patil. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मंत्री अनिल पाटील यांच्याकडून नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश

Dhule : धुळे तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ पंचनामा करावा, असा आदेश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुमीत पवार यांनी दिली आहे. (Dhule Order of panchnama by minister Anil Patil)

श्री. पवार यांनी अमळनेर येथे मंत्री श्री. पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. धुळे तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कधीही न भरून निघणारे आहे.

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता असून, जिल्हाधिकारी, तसेच संबंधित यंत्रणेला अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे बांधावर जाऊन पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.

तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केली. मागणीचे निवेदन मंत्री श्री. पाटील यांना दिले. त्यावर मंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ योग्य ती कार्यवाहीचे आदेश दिले, असे श्री. पवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT