Officials and employees of Dhule Municipal Council Kastraib Employees Federation while giving the statement of demand to Commissioner and Administrator Amita Dagde-Patil. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सातव्या वेतन आयोगाचा फरक त्वरित द्या! कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची आयुक्तांकडे मागणी

Dhule News : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची एकरकमी रक्कम त्वरित अदा करावी, अशी मागणी धुळे मनपा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्याकडे केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची एकरकमी रक्कम त्वरित अदा करावी, अशी मागणी धुळे मनपा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्याकडे केली. महासंघाने आयुक्तांना याबाबत निवेदन दिले. (Pay 7th Pay Commission Difference Instantly Castribe Employees Federation demands to Commissioner)

धुळे महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्‍कम मिळावी यासाठी वेळोवेळी महासंघामार्फत विनंती करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांनी वशिल्याने व विविध वैयक्तिक कारणे दाखवून, दाखले जोडून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्‍कम मिळवून घेतली आहे.

तसेच ठेकेदारांच्या कामाची देयकेदेखील अदा करण्यात येत आहेत. मात्र, अजूनही बऱ्याच कर्मचाऱ्यांची फरकाची रक्‍कम थकीत आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचेदेखील सातवा वेतन आयोग फरक, ग्रॅच्युइटी व शिल्लक रजेच्या रकमा महापालिकेकडून अदा झालेल्या नाहीत. (latest marathi news)

ही स्थिती पाहता सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची फरक रक्कम व निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन आयोग फरक, ग्रॅच्युइटी व शिल्लक रजेच्या रकमा त्वरित अदा कराव्यात अन्यथा आम्हाला संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा महासंघाने निवेदनाद्वारे दिला. धुळे मनपा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष जाधव.

वरिष्ठ पदाधिकारी सुनंद भामरे, मधुकर निकुंभे तसेच अनिल सुडके, पंकज शर्मा, मुकुंद अग्रवाल, विद्या करडक, राजश्री वाघ, रजनी पटाईत, स्नेहा जाधव, मनोज जोशी, श्रीकांत चव्हाण, संजय शिंदे, मनोज चिलंदे, अनिल वळवी आदी कर्मचाऱ्यांनी मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT