Murder News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : पत्नीचा खून करणारा पती अटकेत; ‘एलसीबी’ची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर झोपेतच कुऱ्हाडीने वार करीत तिची निर्घृण हत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १३) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संजय बांबळे, नरडाणा पोलिस ठाण्याचे अधिकारी सचिन बेंद्रे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. (performance of LCB in arresting husband killed his wife )

सोनीबाई मोहन भिल (वय ३५, रा. दभाषी) असे मृत पत्नीचे नाव आहे. त्यांची गावात घरवजा झोपडी असून, शुक्रवारी रात्री सोनीबाई ही घराबाहेर खाटेवर झोपली होती. रात्रीतून पती मोहन जगदीश भिल (रा. मंदाणे, ता. शहादा, जि. नंदुरबार) याने चारित्र्याच्या संशयातून कुऱ्हाडीने पत्नी सोनीबाई हिच्या डोक्यावर वार करीत तिची हत्या केली. नंतर पती पसार झाला. पहाटे सोनीबाई ही खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.

घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाल्यावर फॉरेन्सिक पथक, श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दोन पथके तयार केली व आरोपीच्या शोधास पाठविली. पथकांनी शहादा येथून आरोपी मोहन भिल याला अटक केली. पथकातील अमरजित मोरे, योगेश चव्हाण, प्रशांत चौधरी, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, महेंद्र सपकाळ आदींनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT