वकवाड : आदिवासी भागातील पेसाअंतर्गत ग्रामपंचायत सांगवी (ता. शिरपूर) येथील जलजीवन मिशन अंतर्गत साडेपाच कोटी निधीतून गावात सुरू असलेल्या जलकुंभाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे सरपंच कनिलाल पावरा व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी काम बद केले. (Poor quality construction of water tank Sangvi)
सांगवी ग्रामपंचायत हद्दीमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्येने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे. त्या अनुषंगाने सांगवी ग्रामपंचायतीसाठी नऊ जलकुंभ व पाइपलाइन धुळे जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलजीवन मिशन योजनेंतर्गत साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून गावातील जुनी सांगवी, भिलाटी, काळापाणी, पिप्रींपाळा, धारबर्डी, नवी सांगवी, नवी सांगवी, चारणपाळा, होऱ्यापाणी, लालकीराळ या ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे काम एक ते दीड वर्षापासून सुरू आहे.
या कामाच्या कंत्राटदाराकडून जलकुंभासाठी मातीमिश्रित कच्चा मुरमाची खडी, मातीमिश्रित रेतीचा वापर होत आहे. तसेच सिमेंट, लोखंड अतिशय कमी प्रमाणात वापरले जात आहे. याबाबत ठेकेदारास वेळोवेळी सूचना केल्या असता, तो ‘हो’ म्हणून वेळ मारून नेत असतो. आज पुन्हा सांगवी ग्रामपंचायत सरपंच कनिलाल पावरा व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत चौकशी केली असता, त्यांच्या निदर्शनास आले. (latest marathi news)
बांधकाम ठेकेदार विजय कटेरिया (संभाजीनगर) यास जाब विचारला असता त्याने सांगितले, की संबंधित ठेकेदार हरिशभाई (रा. आमरोली, गुजरात) येथील असून, त्यांनी मला हे काम कमिशनवर दिले आहे. मला बाकी काहीच माहिती नाही, असे थातूरमातूर उत्तर दिले.
पिण्याच्या पाण्याच्या नवीन जलकुंभाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, याबाबत सांगवी येथील ग्रामस्थांनी, धुळे जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सरपंच कनिलाल पावरा, उपसरपंच रघुनाथ कोळी, ग्रामपंचायत सदस्य ग्यानसिंग पावरा, जिभाऊ कोळी, सुरेश पावरा, गजू पावरा, दिनेश पावरा, जगन पावरा आदी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.