Dhule News : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे कार्यालयामार्फत शिरपूर तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प अर्थात न्युक्लिअस बजेट योजनेत संयुक्त दायित्व गटांच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी २८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी केले आहे. (Dhule Pramod Patil statement Submit Application for Dairy Development Project)
अ-गटातील उत्पन्न निमिर्ती योजनेत संयुक्त दायित्व गटांच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प योजनेत प्रती लाभार्थी दोन दुधाळ गाई ८५ टक्के अनुदानावर देण्यात येतील. यात १५ टक्के लाभार्थी हिस्सा असून, बँक कर्ज उपलब्ध करून या पथदर्शी प्रकल्पामध्ये संयुक्त दायित्व पाच लाभार्थ्यांचा गावातील गट स्थापन करून सुमूल या दुग्ध प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य सहकारी संस्थेमार्फत करार करून हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल.
आवश्यक कागदपत्र
योजनेच्या लाभासाठी लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. आधार कार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला (एक वर्षाच्या आतील), बीपीएल दाखला, बँक खाते पासबुक, मतदान कार्ड, पॅनकार्ड, दोन पासपोर्ट फोटो अर्जासोबत जोडावेत. एकल महिला, दिव्यांग, आदिम जमातीचे लाभार्थी, महिला यांना प्राधान्य देण्यात येईल.
संयुक्त दायित्व गट असल्यास गटाच्या नावाने अर्ज सादर करता येईल. मात्र, सर्व व्यक्ती गटांच्या सभासदाचे आवश्यक कागदपत्र जोडणे बंधनकारक राहील. लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमार्फत केली असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव व लाभार्थ्याने यापूर्वी कोणत्याही विभागाकडून लाभ घेतला नसल्याबाबत ठरावात नमूद केलेले असावे. (latest marathi news)
येथे साधा संपर्क
अर्जाचा विहित नमुना प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे (२४, बडगुजर प्लॉट, राम सर्जिकल हॉस्पिटल शेजारी, ८० फुटी रोड, पारोळा चौफुली जवळ, धुळे) येथे ७ ते २२ मार्च या कालावधीत (रविवार व शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी) कार्यालयीन वेळेत वाटप केले जातील.
तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज २८ मार्च २०२४ पर्यंत स्वीकारले जातील. मुदतीनंतर फॉर्म वाटप अथवा स्वीकारले जाणार नाहीत. योजनेच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही प्रकल्प अधिकारी श्री. पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.