In Kakor Shiwar here, a tree fell on the road where a chicken died due to the collapse of a poultry wall due to the storm and rain. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Pre-Monsoon : मृगात जोरदार पावसाची साक्री तालुक्यात सलामी! वादळामुळे दाणादाण

सकाळ वृत्तसेवा

Dhule Pre-Monsoon : साक्री तालुक्याच्या बहुतांश भागात शुक्रवारी (ता.७) सायंकाळी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वादळी वाऱ्यासह वरुण राजाने दमदार हजेरी लावत सलामी दिली. जोरदार वादळामुळे दाणादाण उडाल्यामुळे बळीराजाला एकीकडे पावसाच्या आगमनाचा आनंद तर दुसरीकडे नुकसानीमुळे डोळ्यांत मात्र अश्रूंच्या धारा आहेत. वादळामुळे हिंदळा शिवारात भाऊसाहेब शांताराम ह्याळीस यांच्या शेतातील घरातील सर्व पत्रे उडून काही अंतरावर फेकले गेले. ( pre monsoon in district on first day of mrug Nakshatra )

ह्याळीस यांच्या कांदा चाळीतील पत्रा उघडल्याने सुमारे शंभर क्विंटल कांदा पाण्यात सापडला. तसेच जगदीश रघुनाथ पाटील यांच्या शेतातील आंब्याची झाडे उन्मळून पडली. काकोर शिवारात योगेश हिरामण देवरे यांच्या पोल्ट्रीची भिंत पडल्यामुळे सुमारे साडेतीनशे पक्षी मृत्यूमुखी पडले.

चिचंखेडे (ता.साक्री) येथील पाडगण शिवारात प्रा. भूषण विश्वासराव देवरे यांच्या शेतातील कांदा चाळ वादळामुळे सुमारे दोनशे फूट लांब अंतरावर फेकली गेली. येथील होळी चौकात लिंबाचे झाड उन्मळून पडले असून म्हसदीसह, चिंचखेडे, अक्कलपाडा, वसमार, ककाणी, राजबाई शेवाळी, वसमार, भडगाव, काळगाव व देऊर (ता.धुळे) येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (latest marathi news)

तर वर्षभर पावसाचे सातत्य

अनेक गावांत चांगला पाऊस होऊन शेतात पाणी साचले होते. अनेक‌ शिवारात झाडे पडली तर विजेचे अनेक खांब वाकले. अजून जोरदार पाऊस लगातार झाला तर पाणी, चारा समस्या दूर होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. मृग नक्षत्रात पाऊस झाला तर वर्षभर पावसाचे सातत्य राहू शकेल, असा विश्वास बुजुर्ग शेतकऱ्यांनी ‘सकाळ’ कडे व्यक्त केला.

खांब, तारा तुटल्याने वीज खंडित

रात्री उशिराच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांचे खांब वाकल्याने, वीज तारा तुटल्याने रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाला. बिघाड दुरुस्तीसाठी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी परिश्रम घेत असून मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने वीज वितरण कंपनीचेही नुकसान केल्याची माहिती सूत्रांनी दिली. साक्री ते म्हसदी ३३ केव्ही वाहिनीचे तीन इन्सुलेटर, म्हसदी गावठाण फिडरवर दहा इन्सुलेटर नादुरुस्त झाले. गावातील होळी चौकात वीज तारा तुटल्या आहेत. वसमार, धमनार गावाच्या वीज वाहिन्या नादुरुस्त झाल्याने पुरवठा खंडित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT