Child Marriage esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Child Marriage : गोताणे गावातील बालविवाह रोखला; तक्रारीनंतर तत्काळ कार्यवाहीमुळे प्रशासनाला यश

Dhule : गोताणे (ता. धुळे) गावात बालविवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने तत्काळ कार्यवाही केल्याने हा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश लाभले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Child Marriage : गोताणे (ता. धुळे) गावात बालविवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने तत्काळ कार्यवाही केल्याने हा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश लाभले. गोताणे येथे २७ फेब्रुवारी २०२४ ला बालविवाह होणार असल्याची तक्रार २५ फेब्रुवारीला जिल्हा बाल संरक्षण कक्ष, धुळे यांना प्राप्त झाली होती. (Dhule Prevented child marriage in Gotane village)

त्या अनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड लाइन प्रकल्प समन्वयक प्रतीक्षा मगर व सुपरवायझर मुकेश महिरे, महेंद्र चव्हाण, तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही. डी. पाटील.

तुषार देवरे व गोताणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व्ही. आर. नवाळणे, सरपंच जिजाबाई पाटील, पोलिसपाटील मधुकर पाटील यांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन बालविवाह अधिनियम २००६ च्या कायद्याबाबत संबंधिताने कायदेविषयक माहिती देण्यात आली.

बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाईस आपण जबाबदार राहाल याची जाणीव करून देण्यात आली. तसेच बालविवाह थांबविण्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील कार्यान्वित यंत्रणेस यश आले असून, बालिकेच्या कुटुंबीयांना बालकल्याण समिती, धुळे येथे २६ फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.(Latest Marathi News)

जनजागृती अभियान सुरू

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, राजेंद्र बिरारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून तसेच जिंगल्स व पथनाट्याच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

तरीदेखील बालविवाह होत आहेत; परंतु प्रशासनाने सतर्कता दाखवून बालविवाह रोखला. या वेळी प्रशासनाचे कर्मचारी, चाइल्ड लाइन १०९८ चे प्रकल्प समन्वयक प्रतीक्षा मगर, सुपरवायझर मुकेश महिरे, महेंद्र चव्हाण उपस्थित होते, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बिरारी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT