कापडणे : खानदेशात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असते. पूर्वजांप्रती आगारी आणि नैवेद्य दाखविण्यासाठी साऱ्यांचीच लगबग सुरु आहे. यासाठी विविध भाजीपाला आवश्यक आहे. भाज्यांना मागणी वाढूनही दर घटण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. सततचा पाऊस सुरु असल्याने मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला पोहच करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे. परिणामी, स्थानिक बाजारातच पालेभाज्यांची रेलचेल वाढली आहे आणि भावही घटले आहे. (price of vegetables within 50 even in Pitrupaksha)
पितृपक्षात सर्वच हिरवा भाजीपाला प्रतिकिलो साठ ते सत्तरच्या पुढेच असतो. यावर्षी प्रथमच सर्वच भाजीपाल्यांचे दर पन्नाशीच्या आत आहे. पितृपक्ष सुरु झाला आणि पुन्हा पाऊस सक्रीय झाला. सातत्यपूर्ण पावसामुळे भाजीपाला दूरच्या बाजारात पोहचत नसल्याची स्थिती आहे. स्थानिक बाजारात भाजीपाला अधिक विक्रीसाठी दाखल होत आहे. त्यामुळे भाव उतरले आहेत.
देवडांगरला अधिक मागणी
पितृपक्षातील आगारीसाठी देवडांगरची मागणी वाढली आहे. प्रतिकिलो २० याप्रमाणे असलेला भाव चाळीसवर गेला आहे. दुप्पटीने भाव वाढल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (latest marathi news)
कोथिंबीर, मेथीची शंभरी
पंधरा दिवसांपूर्वी कोथिंबीरीचे भाव प्रतिकिलो तीनशेवर पोहचले होते. ते पितृपक्षात शंभरावर आले आहे. मेथी दोनशेवर होती. तिही शंभरावर आली आहे.
प्रतिकिलोचे दर
फ्लॉवर : ४०
भेंडी : २०
वांगी : ४०
मिरची : ५०
टोमॅटो : ४०
कारले : ६०
कटुर्ले : ५०
गिलके : ५०
पालक : ४०
शेवगा : ६८
मुळा : ४०
पोकळा : ४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.