शिंदखेडा : गेल्या ४० वर्षांपासून शिंदखेडा शहर भाजी मार्केटचा प्रश्न प्रलंबित आहे. नवीन भाजी मार्केट बांधून तयार आहे; परंतु या मार्केटमध्ये साठच ओटे आहेत. उर्वरित भाजी विक्रेते रस्त्यावरच बसतात. त्यामुळे तेथे कोणी भाजी खरेदीला येत नाही म्हणून नवीन मार्केटमध्ये आपली दुकाने थाटून बसायला कोणी तयार नाही. आजही स्टेशन रोडच्या दुतर्फा भाजी बाजार भरत आहे. (Dhule problem of Shindkheda vegetable market will not be resolved)
प्रश्न सुटावा म्हणून नगरपंचायतीतर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील जागेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ६३ लाख रुपये खर्च करून भाजी मार्केट व शॉपिंग सेंटर तीन वर्षांपूर्वीच उभारण्यात आले. या शॉपिंग गाळे व ओट्यांचा लिलाव गेल्या जुलै महिन्यात करण्यात आला. या लीलावातून नगरपंचायतीला एक कोटीच्या वर डिपॉझिट मिळाले.
गेल्या २५ जानेवारीपासून या ओट्यांवर भाजी विक्रीसाठी बसावे, अशा नोटिसा नगरपंचायतीमार्फत या व्यवसायिकांना देण्यात आल्या होत्या; परंतु या ठिकाणी एकच दिवस व्यवसाय करून भाजी मंडईकडे या व्यावसायकांनी पाठ फिरविली होती. बाकी व्यावसायिक रस्त्यावर बसत असल्याने व्यवसाय होत नसल्याचे कारण त्यांनी दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी सर्व भाजी व फळ विक्रेत्यांची येथील नगरपंचायतीच्या हॉलमध्ये इतर भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा सुचविण्यासाठी १४ फेब्रुवारीला बैठक बोलविली होती. बैठकीत उर्वरित भाजी व फळ व्यावसायिकांना येथील बसस्थानकाशेजारील शासकीय गुदामाच्या जागेचा पर्याय सुचविण्यात आला होता. (latest marathi news)
उर्वरित व्यावसायिकांनी या पर्यायी जागेस आपला व्यवसाय करण्यास होकार दिला होता; परंतु आज दीड महिना होऊनही नगरपंचायत प्रशासनातर्फे व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसत नसल्याने नगरपंचायतीतर्फे भाजी मार्केटचा प्रश्न सोडविण्यास दुर्लक्ष होते की काय, असा प्रश्न विक्रेते व गिऱ्हाइकांना पडू लागला आहे.
लाखो रुपये वाया जाणार?
त्रेसष्ट लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या भाजी मार्केटची स्थिती वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जयप्रकाश नारायण भाजी मार्केटसारखी होते की काय, शासनाचा लाखोंचा खर्च वाया जातो की काय, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. या प्रश्नाकडे नगरपंचायत प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.
"उर्वरित व्यावसायिकांना बसस्थानकाशेजारी शासकीय गुदामाची जागा सुचविण्यात आली. ही जागा महसूल विभागाच्या ताब्यातली आहे. ती जागा वापरण्यासाठीची परवानगी नगरपंचायत प्रशासनाने मागितलेली आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही परवानगी मिळालेली नाही."- सचिन वाघ, प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.