Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मालमत्ता करापोटी 18 कोटी रुपयांवर वसुली! मनपाची 6 महिन्यांतील कार्यवाही

Latest Dhule News : २०२३-२४ या आर्थिक वर्षात चालू मागणी व थकबाकी मिळून एकूण ६० कोटी ७९ लाखांची मागणी आहे. यामध्ये शास्तीची रक्कम २० कोटींपर्यंत आहे. १ एप्रिलपासून आतापर्यंत १८ कोटी ९२ लाखांची रुपयांची वसुली झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यापारी गाळे, ओटे, विकास शुल्क हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मालमत्ता करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट साधण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात चालू मागणी व थकबाकी मिळून एकूण ६० कोटी ७९ लाखांची मागणी आहे. यामध्ये शास्तीची रक्कम २० कोटींपर्यंत आहे. १ एप्रिलपासून आतापर्यंत १८ कोटी ९२ लाखांची रुपयांची वसुली झाली आहे. (Dhule Property tax recovered of Rs 18 crore)

मालमत्ता करासोबत विशेष पाणीपट्टी कर, विशेष स्वच्छता कर, विशेष शिक्षण कर, वृक्षसंवर्धन कर, अग्निशमन कर, जललाभ कर, दिवाबत्ती कर, मलनिस्सारण कर, पथकर, मलप्रवाह सुविधा कर, महाराष्ट्र शासन शिक्षण कर, रोजगार हमी कर, मोठ्या निवासी जागा कर आदी करांची वसुली होते.

शहरातील मोठ्या थकबाकी धारकांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या थकबाकीची प्रकरणे २८ सप्टेंबरला होणाऱ्या महालोक अदालतीत ठेवली आहेत. त्याअनुषंगाने २८ सप्टेंबरपर्यंत थकीत करावर शंभर टक्के शास्ती माफी दिली आहे. कर भरण्याकामी सहा हजार थकबाकीधारकांना नोटिसा बजवात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मालमत्तांची भर

शहरातील ७० हजारांवर मालमत्तांची नोंद मनपात आहे. तसेच नूतन सर्वेक्षणात हद्दवाढ भागातील ३७ हजार व देवपूर भागातील १३ हजार ५३६, साक्री रोड भागातून २३ हजारांवर मालमत्तांची भर पडली आहे. मात्र, सुधारित कर आकारणीमुळे मालमत्ताधारकांना अवाजवी बिले गेली आहेत. (latest marathi news)

त्यास हरकतीच्या माध्यमातून नागरिकांनी विरोध केला आहे. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने जुन्या मालमत्तांना पूर्वीच्या दराने करआकारणी सुरू ठेवली आहे. पण, यासंदर्भातसुद्धा नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये करवसुली ठप्प झाली होती. थकबाकीची प्रकरणे २८ सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात होणाऱ्या महालोक अदालतीत ठेवण्यात येतील.

३२४ जणांची उपस्थिती

महापालिकेतर्फे सुधारित कर आकारणीच्या दृष्टीने कारवाई सुरू केली आहे. त्यात यापूर्वी प्राप्त हरकतींवर सुनावणी झाली. तर दिलेल्या तारखेला हजर न राहिलेल्या मालमत्ताधारकांना सुनावणीसाठी पुन्हा संधी देण्यात आली. सुनावणीचे कामकाज बुधवारी (ता. २५) मनपा सभागृहात झाले. त्यात ४०० मालमत्ताधारकांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ३२४ जणांनी सुनावणीला हजेरी लावली, तर ७६ जण गैरहजर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT