Fruit Crop Insurance Scheme esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fruit Crop Insurance Scheme : फळपिक विमा योजनेत 3 लाख रूपयांवर संरक्षण; उत्पादकांना लाभाचे आवाहन

Latest Dhule News : फळपिक उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fruit Crop Insurance Scheme : जिल्ह्यात विविध फळपिक विमा योजनेंतर्गत सरासरी दोन हजारापासून ते साडेआठ हजारापर्यंत विमा हप्ता असून, त्यात सरासरी चाळीस हजारापासून पावणेचार लाखांपर्यंत संरक्षण मिळणार आहे. फळपिक उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले. (Protection up to 3 lakh rupees in fruit crop insurance scheme)

कृषि क्षेत्रात उत्पादन वाढीमध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, फळपिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने मदत होईल. त्यासाठी जिल्ह्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.

हवामानाच्या विविध धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

या योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी १९ हजार रुपयात ३ लाख ८० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कैलास शिरसाट यांनी केले आहे.

आंब्यासाठी विमा

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेतील धुळे जिल्ह्यात आंबिया बहारासाठी आंबा, केळी, द्राक्ष, पपई या फळपिकास विम्यासाठी महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात येत आहे. आंबिया बहार २०२४- २०२५ या वर्षासाठी अधिसूचीत फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निर्धारित करण्यात आला असून निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतक-यांना नुकसान भरपाई देय होईल.

आंबा पिकासाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीठ या धोक्यांसाठी शेतकरी विमा हप्ता ८ हजार ५०० इतका असून यासाठी १ लाख ७० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. (latest marathi news)

विम्यासाठी अंतिम मुदत

केळी पिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान, गारपीट या धोक्यांसाठी शेतकरी विमा हप्ता ८ हजार ५०० इतका असून यासाठी १ लाख ७० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे.

द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान, गारपीठ या धोक्यांसाठी शेतकरी विमा हप्ता १९ हजार इतका असून यासाठी ३ लाख ८० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे.

पपईसाठी ३१ ऑक्टोबरची मुदत

पपई पिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त पाऊस व आर्द्रता, गारपीट या धोक्यांसाठी शेतकरी विमा हप्ता दोन हजार इतका असून, यासाठी ४० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. शिरसाट यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT