As Bhogavati river flooded, flood water entered the house on the bank. During the inspection, Additional Tehsildar Sambhaji Patil, BJP's Vijay Marathe, Nikhil Jadhav, Talathi Sanjay Gosavi. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Rain Damage : दोंडाईचा येथे भोगावती नदीच्या पुराचे पाणी काठावरील घरांत; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Dhule Rain Damage : शहर व परिसरात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने भोगावती नदीला मोठा पूर आला. संगम डेअरीजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने काठावरील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाल्याने लाखोंचे नुकसान झाले. संबंधित ठेकेदाराने मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा केला असून, भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन पीडित रहिवाशांना देण्यात आले. ( Flood Waters of river Bhogavati in Dondaicha in house )

नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील घरांमध्ये पाणी गेले. चैनी रोड परिसरातील गोविंदनगर येथील संघम डेअरीच्या गल्लीत उड्डाणपुलाचे काम सुरू असून, ठेकेदाराने वेळेवर काम केले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांचा आहे. (latest marathi news)

वरवाडे भागातील हातगाड्या, टपऱ्या दोन मोटारसायकली वाहून गेल्या. अमरावती नदीलाही पूर आला होता. अपर तहसीलदार संभाजी पाटील यांची घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तलाठी संजीव गोसावी यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. उड्डाणपुलाच्या ठेकेदार प्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यांना आर्थिक मदत करण्याचे सांगितले.

वीस वर्षांनंतर मोठा पूर

या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, नरेंद्र गिरासे, सचिन मराठे आदींनी धाव घेऊन मदतकार्य केले. प्रशासनातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, हेमंत राऊत यांच्यासह पोलिस कर्मचारी बंदोबस्त ठेवून होते. महसूल विभागाचे तलाठी संजय गोसावी, नारायण मांजळकर घटनास्थळी दाखल झाले.‌ वीस वर्षांनंतर मोठा पूर आल्याचे सांगितले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT