Damage to agriculture due to dam burst due to heavy rains in Shiwar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Cloud Burst : धो-धो बरसला अन भांडणे लावून गेला! बांध फुटल्याने शेतीचे नुकसान

Cloud Burst : गेल्या सोमवारी (ता.२२) ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेती शिवारातील बांध बंदिस्ती फुटले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Cloud Burst : गेल्या सोमवारी (ता.२२) ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेती शिवारातील बांध बंदिस्ती फुटले. एका शेतीतील पाणी दुसऱ्‍या शेतीत शिरल्याने मोठे नुकसान झाले. तुझ्या शेतातील पाणी माझ्या शेतात शिरले. यावरून बांध शेजाऱ्‍यांमध्ये भांडणे जुंपली आहेत. यामुळे मुसळधार कोसळला अन भांडणे लावून गेला, असा मनस्ताप पावसाबाबत शेतकऱ्‍यांमधून व्यक्त होत आहे. ( rain heavily like cloud burst Due to this rain dams in agricultural area burst)

कापडणे परिसरातील धनूर, तामसवाडी, कौठळ, न्याहळोद, जापी, बिलाडी, धमाणे, तिसगाव, ढंढाणे, वडेल, सरवड व देवभाने शिवारात ढगसदृश मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणी शेतीचे बांध फुटले होते. एका शेतीचे पाणी दुसऱ्‍या शेतात, दुसऱ्‍याचे तिसऱ्‍या शेतात शिरले. बांध कोरून कोरून लहान झाले आहेत. त्यामुळे हे बांध फुटल्याचे बोलले जात आहे. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने अनेकांची शेती खरडली गेली आहे. (latest marathi news)

यामुळे आधीच बांधावरून भांडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा बांधच फुटल्याने जुंपली आहे. काहींच्या शेतातील ठिबकच्या नळ्या वाहून गेल्या आहेत. काही शेतकऱ्‍यांची शेती खरडली गेल्याने पीक घेणे अशक्य झाले आहे. लाखोंची जमीन वाळवंटासारखी झाली आहे. नापिक झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पावसाळ्यानंतर नदीतील वा बंधाऱ्‍यातील गाळ टाकूनच ही जमीन सुपीक करावी लागणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

शेतीबांध असावेत मोठे

तीन वर्षांपूर्वी शेतीचे बांध मोठ-मोठे होते. यामुळे पाण्यापासून बचावासाठी बांधबंदीस्तीसाठी विशेष अनुदानही शासनाकडून दिले जात होते. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्‍यांनी पुन्हा एकदा बांधाला न कोरता बांधबंदिस्तीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जाणकार शेतकऱ्‍यांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT