At Hadakhed check post, the inspection team moves on the bypass road in the inspection van. Underground electronic weighing fork. esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL IMPACT : हाडाखेड चेक नाक्यावर बायपास अवैध वाहतूक बंद; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; प्रत्यक्ष कारवाई सुरू

Dhule News : हाडाखेड चेक नाक्यावरील मागच्या बाजूने बायपास रस्त्यावरून अवैध वाहतूक होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : हाडाखेड चेक नाक्यावरील मागच्या बाजूने बायपास रस्त्यावरून अवैध वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे डीपीटीएल (अदाणी ग्रुप) कंपनीचे आर्थिक नुकसान होत असताना शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. ‘सकाळ’ने या रस्त्यावरील अवैध वाहतूक होत असल्याचे समस्येचे वृत्त (६ मार्च) प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र राज्य सरकार आरटीओ कार्यालय, धुळे यांच्याकडून महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटर्वक लिमिटेड, हाडाखेड व डीपीटीएल (अदाणी ग्रुप) कंपनी हाडाखेड यांना अवैध वाहतूक बंद करण्यासंदर्भात १२ मार्चला पत्र देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने बुधवारी (ता. १० एप्रिल) अवैध वाहतूक रोखण्यासाठी धुळे, आरटीओ कार्यालयामार्फत फिरते तपासणी पथक भ्रमण जाँच इकाई व्हॅन व भूमिगत इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बायपास रस्त्याच्या बाजूला बसविण्यात आल्याने बायपास अवैध वाहतूक बंद झाल्यामुळे लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहे. (dhule Bypass illegal traffic stopped at Hadakhed check post marathi news)

मध्य प्रदेश व महाराष्ट्राकडून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) तपासणी नाक्यावर वाहनामध्ये असलेल्या मालाचे वजन, मालाची अधिकृत बिले तपासली जातात. ओव्हरलोड वाहनांवर दंड आकारला जातो. अधिकचा दंड वाचविण्यासाठी ओव्हरलोड आणि कागदपत्रे अपूर्ण असलेली वाहने सीमा तपासणी नाका टाळण्यासाठी चेक नाक्याच्या मागच्या दोन्ही बाजूने बायपास कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.

त्या रस्त्यावरून चोरट्या मार्गाने तपासणी नाका चुकवत हाडाखेड गावापर्यंत मुख्य महामार्गाला येत होती. या चोरट्या वाहतुकीमुळे काही वाहनांत अवैध व्यवसाय होत असल्याचे नाकारता येत नाही. म्हणून अवैध वाहतूक रोखण्यासाठी धुळे आरटीओ कार्यालयामार्फत फिरते तपासणी पथक भ्रमण जाँच इकाई व्हॅन व भूमिगत इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बायपास रस्त्याच्या बाजूला बसविण्यात आले.  (latest marathi news)

सोबत दोन सुरक्षारक्षक, एक आयटी इंजिनिअर यांचा समावेश आहे. आठ तासांनी कर्मचारी बदलणार असून, रोज तीन पथके कार्यरत असणार आहेत. विशेष म्हणजे दररोज पथकातील कर्मचारी बदलणार, बायपासने अवैध वाहन गेल्याने अनलोड वाहनास ऑनलाइन पावती दिली जाते. वाहन ओव्हरलोड असल्यास वजनाप्रमाणे दंडाची पावती ऑनलाइन दिली जाते. व्हॅनमध्ये सेन्सर कॅमेरे बसविले आहेत. अलार्म, लाइट, कॉम्प्युटरसह सर्व यंत्रणा बसविण्यात आली आहे, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT