Cotton crop of last kharif season in Shindkheda taluk. (archived) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: शिंदखेड्यात दुष्काळी अनुदान परस्पर कर्ज खात्यात वर्ग! बँकांची मनमानी; राज्य शासनाच्या आदेशाला ‘केराची टोपली’!

Dhule News : शासनाने दुष्काळी अनुदानासाठी सुमारे ८६ कोटी मदतीपोटी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी अनुदान देण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : खरीप हंगाम-२०२३ मध्ये राज्यातील ४० तालुक्यांतील दुष्काळी तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश होता. शासनाने दुष्काळी अनुदानासाठी सुमारे ८६ कोटी मदतीपोटी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी अनुदान देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले दुष्काळी अनुदान संबंधित बँकांनी अथवा अन्य वसुलीपोटी कर्ज खात्यात जमा करू नये, असा शासनाचा आदेश असतानाही तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान थेट कर्ज खात्यात जमा केल्याने शेतकऱ्यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. (Dhule Shindkheda drought subsidy class in mutual loan account)

शिंदखेडा तालुक्यात यंदा खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिके वाया गेल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने ३१ ऑक्टोबर २०२३ ला आदेश काढून दुष्काळ जाहीर केला होता. त्यात शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. जिरायत पिकांसाठी हेक्टरी आठ हजार ५००, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार ५०० रुपये व फळबागेसाठी २२ हजार ५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

‘केवायसी’साठी हेलपाटे

दुष्काळी अनुदानसाठी मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘मदत आधार प्रमाणीकरण पावती’ म्हणजे केवायसी करणे शेतकऱ्यांना ई-सेवा केंद्रावर जाऊन बंधनकारक आहे. मदत व पुनर्वसन विभागाची साइट चालत नसल्याने ई-सेवा केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर हे अनुदान बॅंकेच्या खात्यात जमा होत नसल्याने शेतकरी नाके नऊ आलेले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांचे ‘आडमुठे’ धोरण

दुष्काळी मदतीची केवायसी झाल्यानंतर ज्या बँकेचा क्रमांक दिला असेल त्या बॅंकेच्या बचत खात्यात दुष्काळी मदत जमा होते. मात्र तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी हे मदत अनुदान कर्ज खात्यात जमा केले आहे. शासनाने व सहकार विभागाने आदेश काढला आहे, की कोणते अनुदान कर्ज खात्यात जमा न करता शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करणे बॅंकांना बंधनकारक असताना बँका दुष्काळी अनुदान कर्ज खात्यात जमा करीत आहेत. सध्या शेतकरी खरीप हंगामाची तयारी करीत आहे. शासनाने दिलेली मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी सावकाराचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली आहे. (latest marathi news)

खरीप २०२३ दुष्काळी अनुदान निधीवाटप

क्षेत्राचा प्रकार शेतकरी क्षेत्र (हेक्टर) निधी (लाख)

जिरायत ७९५४४ ९५५०४.६९ ८२०२.९०

बागायत ९२१ १६१८.०९ २७५.२१

फळबाग ७८९ ७५४.०९ १६९.६९

---------------------------------------------------------------------

एकूण ८१२५४ ९८८७७.७७ ८६४७.८०

"शिंदखेडा तालुक्यातील सर्व बॅंकांच्या शाखाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शासनाचे जे काय शेतकऱ्यांना व इतरांना आर्थिक मदत किंवा अनुदान दिले जाते ते कर्ज खात्यात जमा करता येणार नाही अशा सपष्ट सूचना दिल्या आहेत. काही बँकांच्या तक्रारी येत आहेत. तसे आढळल्यास संबंधित बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल."

-ज्ञानेश्वर सपकाळे, तहसीलदार, शिंदखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT