Fake Currency esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fake Currency : बनावट खत कारखाना उद्‍ध्वस्त! करवंद येथे 23 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : वर्षभरापूर्वी परवाना रद्द केलेल्या कंपनीच्या ब्रॅन्डखाली खते तयार करण्याचे काम सुरू असलेला कारखाना शहर पोलिसांनी छापा टाकून उद्‍ध्वस्त केला. ११ जुलैला सकाळी दहा ते रात्री उशिरापर्यंत ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून खतांच्या साठ्यासह एकूण २३ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (shirpur Crime Fake fertilizer factory destroyed 23 lakh worth of goods seized at Karvand)

तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री पावणेतीनला एकास अटक करण्यात आली. करवंद गावाकडून लौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सॅनस्टार स्टार्च फॅक्टरीजवळ शेतातील गुदामात बनावट खते तयार केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांना मिळाली होती.

त्यांनी कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व अन्य अधिकाऱ्यांसह उपनिरीक्षक हेमंत खैरनार, संदीप दरवडे, हवालदार योगेश दाभाडे, विनोद आखडमल, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सचिन वाघ, दुसाने आदींनी घटनास्थळी छापा टाकला. तेथे गोणीत खते भरण्याचे काम सुरू होते.

संशयित मनोज खेतराम पटेल (वय ३५, रा. नारायणनगर, शिरपूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा कारखाना किशोर शालिकराव पाटील (रा. करवंद, ता. शिरपूर) याच्या मालकीचा असल्याचे त्याने सांगितले. कंपनीचा परवाना, साठा पुस्तक, खरेदी बिले आदी कोणतीच कागदपत्रे कारखान्यात नव्हती. (latest marathi news)

मे. निर्मल फर्टिलायझर्स ब्रॅन्डच्या गोण्या व पाकिटांमध्ये खते भरली जात होती. कृषी विभागाने चौकशी केली असता २०२३ मध्ये पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या नोंदणी अधिकाऱ्यांनी मे. निर्मल फर्टिलायझर्स या कंपनीचा खत उत्पादन व विक्री परवाना रद्द केल्याचे निष्पन्न झाले.

तेवीस लाखांचा मुद्देमाल

गुदामाची झडती घेतली असता पोलिसांना निर्मल फर्टिलायझर्स कंपनीचे १२:६१:०० सुटे खत, पाकिटे आणि गोण्यांमध्ये भरलेले खत, वजनकाटा, प्लॅस्टिक पाउच, स्प्रे पंप, शिक्का, पॅकिंग मशिन असा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. त्याची एकूण किंमत २३ लाख ७१ हजार रुपये आहे.

तिघांवर गुन्हा

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मे.निर्मल फर्टिलायझर्सचे मालक, किशोर शालिकराव पाटील व मनोज खेतराम पटेल या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा मनोज पटेल याला अटक करण्यात आली. किशोर पाटील यापूर्वीही बनावट खतांचा साठा बाळगणे व विक्रीच्या गुन्ह्यात आरोपी आहे. तायडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी संजय पवार, मोहीम अधिकारी प्रदीप निकम, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेश चौधरी, मंडळ कृषी अधिकारी राजेश मोटे आदींनी कारवाईसाठी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT